मुंबई, 13 जुलै : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरून मुंबई हायकोर्टाने फटकारले होते. आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला ?, असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं.बॉम्बे पोलीस अॅक्टनुसार थिएटर मालकांवर कारवाई करता येईल का ?, याचा तपशील सादर करा असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.
मनसेनंही मल्टिप्लेक्सविरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर थिएटर्स मालक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा