एसटी बसने कात टाकली, रावतेंच्या संकल्पनेतून साकारली 'परिवर्तन बस'

एसटी बसने कात टाकली, रावतेंच्या संकल्पनेतून साकारली 'परिवर्तन बस'

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पेतून परिवर्तन बस साकारली आहे. लवकरच ही बस रस्त्यावर धावणार आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

11 मे : लाल रंगाची ओळख असलेल्या एसटी बसने आता कात टाकलीये. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पेतून परिवर्तन बस साकारली आहे. लवकरच ही बस रस्त्यावर धावणार आहे.

या नव्या बसला परिवर्तन बस नाव देण्यात आलंय. या बसची दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत बांधणी सुरू आहे. एरोडायनामिक पद्धतीने या बसची बांधणी सुरू आहे. त्यामुळे हवेचा प्रतिरोध कमी होणार आहे. ही बस जुन्या बसपेक्षा 30 सेमीने उंच आहे. सामान ठेवण्याची तिनपट जागा उपलब्ध करून देण्यात आलीये. तसंच जुन्या बसपेक्षा खिडक्याचा आकारही मोठा असणार आहे. एवढंच नाहीतर मार्ग फलक हा एलईडी करण्यात आलाय.

प्रायोगिक बस पुढच्या काही दिवसात रस्त्यावर धावणार आहे. माईल्ड स्टीलमध्ये या गाडीची बांधणी करण्यात आली आहे त्यामुळे अपघाताच्या वेळी कमीत कमी जीवित आणि वित्तहानी होण्यास मदत मिळणार आहे.

First published: May 11, 2017, 9:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading