HSC RESULT : दिव्यांग निष्काचं आभाळाएवढं यश, कहाणी ऐकूण तुम्हीही कराल सलाम!

HSC RESULT : दिव्यांग निष्काचं आभाळाएवढं यश, कहाणी ऐकूण तुम्हीही कराल सलाम!

दिव्यांग असलेल्या निष्का हिनं मोठ्या अडथळ्यांवर मात करत 12 वी मध्ये घवघवीत यश मिळवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मे : महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (दिनांक 28 मे) जाहीर झाला आहे. यंदाही अनेक मुलांनी नव्वद टक्क्यांचा टप्पा पार करत यश मिळवलं. पण यातही सर्वात लक्ष वेधून घेतलं ते मुंबईतील निष्का होसंगडी हिच्या यशानं. कारण दिव्यांग असलेल्या निष्का हिनं मोठ्या अडथळ्यांवर मात करत 12 वी मध्ये घवघवीत यश मिळवलं आहे.

निष्का होसंगडी ही मुंबईतील सोफिया कॉलेजमध्ये शिक्षण घेते. लहानपणीच तिला दुर्धर आजारानं ग्रासलं. त्यामुळे तिच्या हाताची हालचाल होणं बंद झालं. तसंच तिची वाचाही गेली. अशावेळी अनेक मुलं खचून जातात. पण निष्का मात्र खंबीरपणे उभी राहिली आणि तिने आपल्या अंपगत्वावर मात करत शिक्षणात चांगलं यशही मिळवलं.

HSC RESULT : बारावी निकाल इथे पाहा एका क्लिकवर

आयपॅडवर बारावीची परीक्षा दिलेल्या निष्काने 73 टक्के मिळवले आहेत. संघर्ष करत मिळवलेल्या या यशानंतर निष्कावर आता सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

एकूण निकाल : 85.88 टक्के

मुली : 90.25 टक्के

मुले : 82.40 टक्के

विभागवार निकाल

महाराष्ट्रात बारावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे.

निकालाची एकूण टक्केवारी :

कोकण विभाग (सर्वाधिक) : 93.23

नागपूर विभाग (सर्वात कमी): 82.05

मुंबई विभाग : 83.85

पुणे विभाग : 87.88

नाशिक विभाग : 84.77

लातूर विभाग : 86.08

अमरावती विभाग : 87.85

कोल्हापूर विभाग : 87.12

VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण: चुकीला माफी नाही, कठोर कारवाई करणार- गिरीश महाजन

First published: May 28, 2019, 2:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading