• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, Suicide Note मधून धक्कादायक माहिती समोर

मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, Suicide Note मधून धक्कादायक माहिती समोर

Mr. India Manoj Patil attempt to commit suicide: मनोज याला त्याच्या उपचारासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:
    मुंबई, 16 सप्टेंबर : मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटील (Former Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी रात्री त्याने आत्महत्येचा प्रयत्न (Attempt to suicide) केला. धक्कादायक म्हणजे हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मनोज पाटील याने एक सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये त्याने अभिनेता साहिल खान याच्यावर गंभीर आरोप केला आहे. बुधवारी रात्री विषारी गोळ्या घेत मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोज याला त्याच्या उपचारासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मनोजची प्रकृती स्थिर आहे. फक्त 5 हजार 500 रुपयांवर मुंबई गाठणारा सोनू आज आहे तब्बल इतक्या कोटींचा मालक अभिनेता साहिल खानवर आरोप मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज पाटील याने आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये त्याने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला विनाकारण त्रास देतो आणि सोशल मीडियात बदनामी करतो त्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचं मनोजने म्हटलं आहे. मनोज पाटील याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांत भाग घेतला आहे. मनोज पाटील याने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनोज पाटील याचे कुटुंबीय मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
    First published: