MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, आता परीक्षा केंद्र बदलता येणार!

MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, आता परीक्षा केंद्र बदलता येणार!

मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थीही त्यांना जवळचं परीक्षा केंद्र घेऊ शकतील.

  • Share this:

मुंबई 14 ऑगस्ट: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSCने पूर्व राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर केली होती. 13 सप्टेंबर 2020 रोजी निश्चित केलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 20 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. एमपीएससीकडून(Maharashtra public  service commission) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. मात्र अजुनही वाहतूक व्यवस्था पूर्ववत झालेली नाही त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचणार कसे असा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. मात्र आता आयोगाने विद्यांसाठी नवी सुविधा दिली असून त्यांना आपलं जवळचं परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.

आहे. कोरोनाच्या साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नंतर 13 सप्टेंबर ही तारीख दिली होती मात्र त्याच दिवशी देशव्यापी NEETची परीक्षा होणार असल्याने आयोगाने ही नवी तारीख जाहीर केली होती.

ज्या मुलांनी मुंबई, पुणे केंद्र घेतलं असेल त्यांना याचा फायदा होणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी त्यांना जवळचं परीक्षा केंद्र घेऊ शकतील.

Air India One: PM मोदींसाठी अमेरिकेत तयार झालं ‘खास’ विमान

कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्वच मुलांना आपल्या गावी परत यावं लगालं होतं. राज्या सर्वात जास्त मुलं पुण्यात परीक्षेचा अभ्यास करतात. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. या शेकडो मुलांना याचा मोठा फटका बसला आहे.

पुणेकरांसाठी अजित पवारांचा मोठा निर्णय, कोरोनाला हरवण्यासाठी देणार मोठा निधी

याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही झाल्याने मुलांची चिंता वाढणार आहे. आता परिक्षा केंद्रावर कसं पोहोचायचं याचा पेच त्यांच्यासमोर आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंतच लॉकडाऊन असून त्यानंतर सरकार कुठला निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 14, 2020, 10:15 PM IST
Tags: mpsc exam

ताज्या बातम्या