Home /News /mumbai /

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई, 9 ऑक्टोबर : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकडून वारंवार होत होती. ठाकरे सरकारने अखेर मोठा निर्णय घेत राज्य सेवा मंडळाच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका झाली. आता पु्न्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडल्यानंतरच परीक्षा होण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 9 ऑक्टोबर : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकडून वारंवार होत होती. ठाकरे सरकारने अखेर मोठा निर्णय घेत राज्य सेवा मंडळाच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्याद्यांना त्रास होऊ नये यासाठी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका झाली. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे MPSC परीक्षा येत्या 11 आॅक्टोबरला होणार होती. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा धोका आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आल्या कारणाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना मुख्यमंत्र्यांनी काहीही केले नाही. याशिवाय मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीचा निर्णय कसा घेतला, असा सवालही मेटे आणि मराठा आंदोलनातल्या नेत्यांनी उपस्थित केला होता. त्याशिवाय विरोधकांकडूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला होता. आता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने नाराज मराठा समाजाला दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. छत्रपती उदयन राजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण आणि एमपीएससीबद्दल सोशल मीडियातून पोस्ट केली होती. मराठा समाजाचा अंत पाहू नका, असं म्हणत उदयन राजे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ““येत्या 11 तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच 15 हजार जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का झाली आहे? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठी चिड निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे,” अशी टीका उदयनराजेंनी केली आहे. ” असं राजेंनी लिहिलं होतं. मराठा क्रांती मोर्चा,संभाजीराजे,उदयनराजे ,विनायक मेटे हे सर्व जण mpsc परीक्षा पुढं ढकला अन्यथा उद्रेक होईल असं म्हणत असताना मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड मात्र परीक्षा झाल्याच पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना आम्ही संरक्षण देऊ असं म्हणत आहेत. संंभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड म्हणाले, आरक्षणाचा हेतू नोकरी मिळवणं आहे आणि आता mpsc असो वा पोलीस भरती हे सर्व नेते ,संघटना त्यालाच विरोध करत आहेत हे विरोधाभास आहे असं गायकवाड यांनी म्हटलंय
First published:

Tags: Maratha reservation

पुढील बातम्या