MPSCच्या पूर्व परीक्षेचं वेळापत्रक बदललं, ही आहे नवी तारीख

MPSCच्या पूर्व परीक्षेचं वेळापत्रक बदललं, ही आहे नवी तारीख

राज्यातून काही लाख विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात. त्यांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

  • Share this:

मुंबई 22 मार्च : कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. राज्य सरकारने या आधीच 1 ते 8वीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तर 10वीचा भूगोलाचा पेपरही रद्द केला आहे. सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते MPSC पूर्व परीक्षेकडे. 5 एप्रिलपासून ही परीक्षा होणार होती. मात्र आता ही परीक्षा 26 एप्रिलला होणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलं आहे. राज्यातून काही लाख विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात. त्यांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवत वाढत आहे. ही संख्या लक्षात घेता या रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती. मुंबईसह पुण्यात कोरोना तपासण्यांची क्षमता लवकरच 100 हून 2200 करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशे पर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज मुंबई येथे दिली.

आई दवाखान्यात मात्र महाराष्ट्राचा लढवय्या लेक कोरोनाशी लढतोय, टोपेंचं कौतुक

शासकीय रुग्णालयाच्या चाचणी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याबरोबरच मुंबईतील सात खासगी प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी मान्यता देण्यासंदर्भातही वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडे केली होती. यानुसार पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टाटा मेमोरियल सेंटर ऍडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेन्ट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कँसर, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, थायरोकेयर लॅबरोटरीज, एस.आर. एल. डायग्नोस्टिक आणि रिलायन्स लॅबरोटरीज,नवी मुंबई या खासगी केंद्रांचा यात समावेश आहे.

कंटाळवाण्या 'लॉकडाऊन'मध्ये तग कसा धरायचा? अमित ठाकरेंनी दिल्या टिप्स

या प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. दररोज प्रत्येकी 100 नमुने तपासण्याची या चाचणी केंद्रांची क्षमता आहे. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होताच या प्रयोग शाळांमधूनही करोनाची चाचणी उपलब्ध होणार आहे.

 

First published: March 22, 2020, 11:33 PM IST
Tags: mpsc exam

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading