मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /‘मी शब्द पाळला’ अजित पवारांच्या दाव्यावर राज्यापालांनी फेरलं पाणी!

‘मी शब्द पाळला’ अजित पवारांच्या दाव्यावर राज्यापालांनी फेरलं पाणी!

अजित पवारांनी या विलंबासाठी मी नाहीतर राज्यपाल जबाबदार असल्याचं सुचित केलं होतं. पण त्यावर राज्यपालांनी थेट tweet द्वारेच पलटवार करून ….

अजित पवारांनी या विलंबासाठी मी नाहीतर राज्यपाल जबाबदार असल्याचं सुचित केलं होतं. पण त्यावर राज्यपालांनी थेट tweet द्वारेच पलटवार करून ….

अजित पवारांनी या विलंबासाठी मी नाहीतर राज्यपाल जबाबदार असल्याचं सुचित केलं होतं. पण त्यावर राज्यपालांनी थेट tweet द्वारेच पलटवार करून ….

    मुंबई, 04 ॲागस्ट : mpsc आयोगाच्या सदस्य नियुक्ती विलंब वादावरून आता थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor of Maharashtra )यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (ajit pawar) पलटवार केला आहे. अजितदादांनी mpsc यादीचा निर्णय 31 तारखेला घेतला असं सांगितलं. पण राज्यपालांनी सदरील यादी २ ॲागस्टला यादी मिळल्याचा खुलासा केला आहे.

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्वीट करून अजित पवारांचा दाव्यातून हवा काढण्याचा प्रयत्न केला आहे. एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त झाली आहे.

    ‘एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे अशा आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली नस्ती सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असून ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे’, असं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    विशेष म्हणजे, mpsc परीक्षार्थिंनी 31 जुलैनंतर क्या हुआ तेरा वादा? असं म्हणत थेट अजित पवारांनाच टार्गेट केलं होतं. त्यावर खुलासा करण्यासाठी रोहित पवार मैदानात उतरले होते. mpsc आयोग नियुक्तीसंबंधी यादी अजित पवारांनी या पूर्वीच राज्यपालांकडे पाठवली असल्याचं tweet करत अजित पवारांनी आपला शब्द पाळल्याचा दावा केला होता.

    थोडक्यात पवारांनी या विलंबासाठी मी नाहीतर राज्यपाल जबाबदार असल्याचं सुचित केलं होतं. पण त्यावर राज्यपालांनी थेट tweet द्वारेच पलटवार करून आपल्याकडे यासंबंधीची नस्ती ही मुळात 2 ऑगस्टला प्राप्त झाल्याचं सांगून अजित पवारांना उघड पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारमधलं tweet वॉर पुढे नेमकं कसं वळणं घेतंय हे पाहणं मोठं रंजक ठरू शकतं.

    First published: