मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

MPSC Exam 2020 परीक्षेबद्दल फेरविचार करावा, नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना फोन!

MPSC Exam 2020 परीक्षेबद्दल फेरविचार करावा, नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना फोन!

   'नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो'

'नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो'

इतर विभागाच्या परीक्षा घेतल्या जात असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे?

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 मार्च : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC Exam 2020) अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला  आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांच्याकडे फोन करून केली केली आहे. तसंच, 'गोंधळ निर्माण करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा भाजपचा कुटील डाव' असा आरोपही पटोले यांनी केला.

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून चर्चा केली आहे. 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना अचानक ती पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. कोविडचे संकट असले तरी कोविड संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करत एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे' अशी माहिती  पटोले यांनी दिली.

MPSC परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्तारोको

'MPSC ची पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा असंतोष दिसत असून त्यांचा संताप योग्यच आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नंतर ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले होते, पण त्यावेळीही या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएसच्या परिक्षेसाठी गाव-खेड्यातून लाखो विद्यार्थी काही वर्ष तयारी करत असतात. अनेकांचे आई, वडील शेतात काम करून, मोलमजुरी करून त्यांना एमपीएसीच्या अभ्यासासाठी शहरात ठेवतात. त्यांच्या या निर्णयामुळे मोठी आर्थिक व मानसिक अडचण होणार आहे. तरुणांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने त्यांचे भवितव्य अंधारकारमय होईल तसेच वयोमर्यादेचा प्रश्नही निर्माण होत आहे. इतर विभागाच्या परीक्षा घेतल्या जात असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे? असा सवालही पटोले यांनी विचारला.

देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेले 10 पैकी 8 जिल्हे फक्त महाराष्ट्रात

'एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर होताच काही राजकीय पक्षाचे लोक त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे एक आमदार या परीक्षा ठरल्याप्रमाणेच झाल्या पाहिजेत असे म्हणत असताना दुसरे आमदार मात्र परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न असतानाही भारतीय जनता पक्ष वेगवेगळी मतं मांडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा, असंही पटोले म्हणाले.

MPSC परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्तारोको

दरम्यान, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची फोनवरुन चर्चा केली. एमपीएससीच्या बदलेल्या तारखांबाबत आजच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. एमपीएससीनं परस्पर परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती आहे. नियोजित तारखेस परीक्षेसाठी सर्व सहकार्य करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असं वड्डेटीवार यांनी सांगितले.

First published:

Tags: नाना पटोले