सोलापूर 09 ऑक्टोबर: MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केलं आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. यानंतरही राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घ्यावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं. आम्ही दबाव टाकला नाही किंवा दमदाटीही केली नाही असंही ते म्हणाले.
समाजाने आपले प्रश्न आग्रहाने मांडणे ही धमकी किंवा दमदाटी नाही असंही त्यांनी सांगितलं. समाजातल्या सर्वच घटकांना फायदा व्हावा हाच आमचा उद्देश असल्याचंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने कुठल्याही दबावाखाली निर्णय घेतलेला नाही तर सर्व परिस्थितीचा विचार करून MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुलांचा अभ्यासही झालेला नव्हता अशा सूचना आल्या होत्या त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
हा फक्त काही मराठा समाजापुरता प्रश्न मर्यादीत नाही. हा व्यापक प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुण्यातली दुकानेही आता रात्री 9 पर्यंत खुली राहणार, ग्राहकांना दिलासा
MPSC परीक्षा अखेर लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. विविध मराठा संघटनांनी या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती. खासदार संभाजीराजे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा आरणक्षाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत या परीक्षा घेऊ नयेत अशी त्यांची मागणी होती. बैठकीत सर्व परिस्थितीचा विचार करण्यात आला आणि हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.