Home /News /mumbai /

MPSC Exam: ‘राज्य सरकारवर दबाव नाही’, निर्णयानंतर अशोक चव्हाणांनी दिली पहिली प्रतिक्रिया

MPSC Exam: ‘राज्य सरकारवर दबाव नाही’, निर्णयानंतर अशोक चव्हाणांनी दिली पहिली प्रतिक्रिया

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुलांचा अभ्यासही झालेला नव्हता अशा सूचना आल्या होत्या त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबई 09 ऑक्टोबर: राज्य सरकारने कुठल्याही दबावाखाली निर्णय घेतलेला नाही तर सर्व परिस्थितीचा विचार करून MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुलांचा अभ्यासही झालेला नव्हता अशा सूचना आल्या होत्या त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. हा फक्त काही मराठा समाजापुरता प्रश्न मर्यादीत नाही. हा व्यापक प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. MPSC परीक्षा अखेर लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. विविध मराठा संघटनांनी या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती. खासदार संभाजीराजे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा आरणक्षाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत या परीक्षा घेऊ नयेत अशी त्यांची मागणी होती. बैठकीत सर्व परिस्थितीचा विचार करण्यात आला आणि हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या आधी काय झालं? MPSCच्या परीक्षा लांबणीवर टाकाव्यात या मराठा संघटनांच्या मागणीवरून आता वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha reservation Issue) निकाली निघेपर्यंत परीक्षा घेऊ नये अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे. त्यावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधले वजनदार मंत्री छगन भुजबळ यांनी परीक्षा पुढे ढकण्याला तीव्र विरोध केला होता. आम्हाला नाही तर कुणालाच नाही ही भूमिका चुकीची असं भुजबळांनी म्हटलं होतं ते म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. जेवढ्या परीक्षा पुढे ढकलू तेवढं वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का आडवतोय. भरतीच्या आड कोणी यावं अस मला वाटत नाही. असा निर्णय झाला तर ओबीसी आणि इतर समाजावर यामुळे अन्याय होईल. नेत्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे असंही भुजबळ म्हणाले होते.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या