Home /News /mumbai /

MPSC exam: एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 आणि 31 ऑक्टोबरला लोकल प्रवासाची परवानगी

MPSC exam: एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 आणि 31 ऑक्टोबरला लोकल प्रवासाची परवानगी

MPSC exam: एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 आणि 31 ऑक्टोबरला लोकल प्रवासाची परवानगी

MPSC exam: एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 आणि 31 ऑक्टोबरला लोकल प्रवासाची परवानगी

MPSC exams: एमपीएससीची परीक्षा येत्या 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या विद्यार्थ्यांना तसेच परीक्षेचे काम करणाऱ्यांना आता लोकल प्रवासाठी परवानगी देण्यात आली आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : एमपीएससीची परीक्षा (MPSC exam) 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी तसेच परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने (local train) प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. परीक्षार्थी तसेच परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर या दोन दिवशी लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारकडून (Maharashtra Government) रेल्वे विभागाला (Railway department) देण्यात आले होते. या मागणीनंतर रेल्वे विभागाने याला परवानगी दिली आहे. राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करणार असून त्यांना 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच परीक्षा घेण्यासाठी लोकाल रेलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे ‘एम एस इनोव्हेटिव्हवी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ हे ही एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असल्याने त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरीता प्रवास करण्याची मुभा द्यावी. तसेच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी असे पत्रात सविस्तरपणे लिहीले होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या 28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेवर (Western Railway) लोकलच्या 100 टक्के फेऱ्या चालवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शासनाने निवडलेल्या श्रेणींनाच एसओपीनुसार प्रवास करण्याची परवानगी आहे. उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा प्री-कोविड स्तरावर म्हणजेच मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 100% चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2020 पासून कोविड-19 लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या. उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रवाशांच्या श्रेणी, नंतर ऑगस्ट 2021 मध्ये आणि अलीकडच्या आठवड्यात वाढवण्यात आल्या. सध्या, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वे अनुक्रमे मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 1702 आणि 1304 उपनगरीय सेवा चालवत आहेत, ज्या त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांच्या 95.70 % आहे. आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात प्री-कोविड स्तरावर 100% उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर 1774 आणि पश्चिम रेल्वेवर 1367 सेवा चालवण्यात येत आहेत. फक्त राज्य सरकारने निवडलेल्या श्रेणी आणि त्यांनी जाहीर केलेल्या SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mpsc examination, Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या