मुंबई, 11 ऑक्टोबर: शिवसेना नेते (Shivsena Leader) आणि खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना दसरा (shiv sena dasara melava) मेळाव्याबाबत मोठी माहिती दिली आहे. यावर्षी दसरा मेळावा होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र चार दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी दसरा मेळावा होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आज त्यांनी दसरा मेळाव्याच्या जागेबाबत माहिती दिली आहे.
यंदाचा दसरा मेळावा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदाचा दसरा मेळावा मांटुग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात पार पडेल.
हेही वाचा- ठाण्यात शिवसेनेची गुंडगिरी, रिक्षावाल्यांना मारहाण करतानाचा Live Video
संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दसरा मेळाव्यात ही माहिती दिली आहे. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी ऑनलाईन दसरा मेळावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गेल्यावर्षी दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ऑनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं होतं. मात्र, यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेणार अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Dasara Melava) यांनी दिली होती.
हेही वाचा- Maharashtra Bandh: बेस्ट बस तोडफोडीचा Live Video आला समोर
गेल्यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतरचा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा हा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.