'राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी 1 खासदार प्रतिनिधींने उपस्थित राहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याने संभाजीराजे संतापले दरम्यान, नांदेडमध्ये मराठा मूक आंदोलन प्रकरणी 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोविड काळात गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयोजकांवर वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे संभाजीराजे कमालीचे संतापले आहे. जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरिब मराठा बांधवांच्यावर का? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थितीत केला होता. सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता मिळणार 'ही' पेन्शन; वाचा सविस्तर समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय असे का? असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थितीत केला.मा. राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी दि २ सप्टें रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 26, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Nanded, President, Sambhajiraje chhatrapati