एमपी मिलच्या रहिवाशांच्या स्वप्नालाही 'घरघर'

एमपी मिलच्या रहिवाशांच्या स्वप्नालाही 'घरघर'

ताडदेव इथल्या प्रकल्पाची आपली वेगळी कहाणी आहे. 1997 पासून इथले हजारो रहिवाशी या ना त्या कारणाने त्रस्त आहेत. आता पुन्हा हा प्रकल्प वादात अडकला आहे.

  • Share this:

मुंबई, रफिक मुल्ला, 04 आॅगस्ट : राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ज्या प्रकल्पावरून अडचणीत आलेत, त्या ताडदेव इथल्या प्रकल्पाची आपली वेगळी कहाणी आहे. 1997 पासून इथले हजारो रहिवाशी या ना त्या कारणाने त्रस्त आहेत. आता पुन्हा हा प्रकल्प वादात अडकला आहे.

मुंबईतल्या ताडदेवच्या एमपी मील कंपाऊंडमधील ही इमारत. ही इमारत पूर्ण आहे किंवा अपूर्ण आहे असं काहीच नक्की म्हणता येणार नाही. याच एमपी मीलमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा वाद निर्माण झालाय. वीस वर्षांपासून या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडलाय. 1997च्या निमयानुसार रहिवाशांना 225 चौरस फुटाची घरं मिळाली. पण 2009 ला नियम बदलल्यानं घराचा आकारमान वाढवून मिळावं यासाठी रहिवासी कोर्टात गेले. पण तिथं निकाल बिल्डरच्या बाजूने लागला.

आता या योजनेचं काम ठप्प झालंय. काही ठिकाणी फ्लॅट्सचं काम अपूर्ण आहे. त्यामुळे नवी इमारत असूनही तिला अवकळा आलीये.

या एसआरए योजनेमुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता अडचणीत आलेत. आता  सरकारी चौकशी आणि कोर्टबाजीत हा प्रकल्प अडकल्यानं रहिवाशांना सुरक्षित आणि हक्काचं घर कधी मिळणार असा प्रश्न रहिवाशांमधून विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2017 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading