मराठा तरुणांना न्याय द्या, नाही तर रस्त्यावर उतरणार -छत्रपती संभाजीराजे

मराठा तरुणांना न्याय द्या, नाही तर रस्त्यावर उतरणार -छत्रपती संभाजीराजे

'विषय गढूळ करायचा नव्हता म्हणून मी महिनाभर इथे आलो नाही मात्र आता रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहणार नाही.'

  • Share this:

मुंबई 02 मार्च : मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेले मराठा तरुणांच्या आंदोलनाचा आज 36वा दिवस आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज आंदोलकांची भेट घेतली. तरुणांच्या मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने त्यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. हे सरकार अधिकारी चालवतात की मुख्यमंत्री चालवतात हा प्रश्न पडलाय अशी टीका त्यांनी केलीय. या मराठा तरुणांना न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाला बाजूला ठेवू नका. 35 दिवस आंदोलन करुनही का पर्याय निघाला नाही, सरकार हे मुख्यमंत्र्यांनी चालवायचं असतं अधिकाऱ्यांनी नाही. अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीमुळे साडेतीन हजार तरुणांचं भवितव्य धोक्यात आल्याचं ते म्हणाले.

विषय गढूळ करायचा नव्हता म्हणून मी महिनाभर इथे आलो नाही मात्र आता पर्याय राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. या आंदोलकांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून देऊ असं आश्वासन त्यांनी तरुणांना दिलं.मुंबईतील आझाद मैदानात मागील 35 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मराठा तरुण आंदोलकांची आणि त्यांच्या वकिलांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर बैठक पार पडली. यानंतर आंदोलकांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे आझाद मैदानात आले. बैठकीबाबत बोलताना विद्यार्थ्यांनी नियुक्त्यांबाबत घोषणा न झाल्याने नाराजी दर्शवली.

 

बैठकीत आंदोलकांच्या वकिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्याना नेमणूका द्याव्यात आशी मागणी केली. तसेच आंदोलक विद्यार्थ्याच्या जागेवर जे विद्यार्थी घेण्यात आले आहेत. त्यातील काही जणांना नोकरीत कायमस्वरूपी पदासाठी समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांची हकालपट्टी करावी आशी मागणी केली.

हे वाचा - नाना पटोले भडकले, मुख्य सचिवांना गेटवर माफी मागण्याची सुनावली शिक्षा

याबाबत अजित पवारांनी देखील तत्काळ दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यासाठी प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील स्थापन केली आहे. यासंबंधातल्या समितीवरून अशोक चव्हाण यांची उचलबांगडी करावी अशी मागणीही छत्रपती संभाजीराजे यांनी केलीय.

हे वाचा -

रश्मी वहिनींकडून अशा टीकेची अपेक्षा नाही - चंद्रकांत पाटील

पिस्तुल नकली आहे की असली? असं विचारताच मित्राने झाडल्या गोळ्या

First published: March 2, 2020, 2:30 PM IST

ताज्या बातम्या