मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'ला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य' यात्रा

मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'ला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य' यात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. येत्या 6 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर प्रारंभ होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. येत्या 6 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर प्रारंभ होणार आहे.

विशेष म्हणजे या यात्रेचे नेतृत्त्व राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार आणि टीव्ही अभिनेते डॉ. अमोल कोल्हे करणार आहे. याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत. दररोज तीन विधानसभा मतदार संघात शिवस्वराज्य यात्रा पोहोचेल. शिवाजी महाराजांचे आजोळ आणि जिजाऊंच्या जन्मस्थळ म्हणजेच बुलडाण्यातील सिंदखेळराजा येथे यात्रेचा पहिला टप्प्याचा समारोप होईल, तर यात्रेचा दुसरा टप्पा 16 ऑगस्टपासून तुळजापूर येथून सुरू होणार आहे. या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सोपवण्यात आली आहे. दरम्यान, येत्या एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मोझरी (ता.तिवसा) येथून प्रारंभ होणार आहे.

भाजप जोमात, विरोधक कोमात!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे हा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 'भाजप'वासी होण्यासाठी या सर्व आमदारांनी मंगळवारी (30 जुलै) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार होते. एवढ्या मोठ्या संख्येनं आज भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपप्रवेश केला. यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते हजर होते.

शरद पवारांबद्दल सांगताना चित्रा वाघ यांचा गळा आला भरून, पाहा हा VIDEO

First published: July 31, 2019, 10:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading