'पोलीस राजा', आता घोड्यांची टाप ऐकताच धडकी भरेल

'पोलीस राजा', आता घोड्यांची टाप ऐकताच धडकी भरेल

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा निर्णय, मुंबई पोलीस दलात अश्वदलाचा समावेश होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी: मुंबई पोलीस दलामध्ये आता अश्व पथकाचाही समावेश करण्यात येणार आहे. तुम्हाला घोड्यावरुन गस्त घालणारे पोलीस दिसल्यास आश्चर्य वाटू देवू नका. कारण प्रजासत्ताक दिनापासून मुंबई पोलीस दलात अश्वदल सहभागी होत आहे. पोलीस घोड्यावर स्वार असल्यामुळं त्यांना उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे.

तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि समुद्र किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी अश्वदल उपयुक्त ठरणार आहे.

या अश्वदलात 30 घोडे, 1 सब-इन्स्पेक्टर, 1 एएसआय, 4 हेडकॉन्स्टेबल आणि 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. विशेष म्हणजे या अश्वदलाकडून जमावावर लाठीचार्ज केला जाणार नाही. मात्र घोडेस्वारामुळे जमाव पांगण्यास मदत होईल असं पोलीस दलाला वाटतं आहे.

घोडेस्वारांना वॉकीटॉकी तसेच बॉडी माऊंटेड कॅमेरा देण्यात आला आहे. मरोळ परिसरात अश्वदलासाठी खास पागा तयार केला जाणार आहेत. सध्या शिवाजी पार्कमध्ये या अश्वांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. गस्तीच्या ठिकाणी वाहनातून अश्वांची ने-आण केली जाणार आहे.

खरं तर ब्रिटीश काळात मुंबई पोलिस दलात अश्वदल कार्यरत होतं. मात्र 1932 मध्ये ते बंद करण्यात आलं. आता 88 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे युनिट सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून हे अश्वदल पोलीस दलात असेल अशी माहिती मिळत आहे. आत्तापर्यंत सरकारनं 13 घोडे खरेदी केले असून येत्या 26 जानेवारीला शिवाजी पार्कच्या पथसंचलनात 11 घोडेस्वार पोलीस सहभाही होणार आहे.

First published: January 20, 2020, 7:49 AM IST

ताज्या बातम्या