• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • हेअर स्टाइल करण्यास मनाई केल्यानं अल्पवयीन मुलीचं धक्कादायक पाऊल, वसईतील घटना

हेअर स्टाइल करण्यास मनाई केल्यानं अल्पवयीन मुलीचं धक्कादायक पाऊल, वसईतील घटना

Crime in Vasai: मुंबईनजीक असणाऱ्या वसईत एक विचित्र घटना समोर आली आहे. आईनं केस कापण्यासाठी मनाई (Mother refused to cut hair) केल्याने मुलीनं धक्कादायक पाऊल उचललं आहे.

 • Share this:
  वसई, 24 नोव्हेंबर: मुंबईनजीक असणाऱ्या वसईत एक विचित्र घटना समोर आली आहे. आईनं केस कापण्यासाठी मनाई (Mother refused to cut hair) केल्याच्या कारणातून येथील एका अल्पवयीन मुलीनं थेट आपल्या घरातून पलायन केलं (minor girl abscond home) आहे. एवढ्या किरकोळ कारणातून मुलीनं असं धक्कादायक पाऊल उचलल्यानं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी घरातून गायब होताच, तिच्या आई-वडिलांनी त्वरीत वळीव पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुलीचा शोध घेतला आहे. घरातून पलायन केलेल्या मुलीला पोलिसांनी शोधून काढल्यानंतर, तिला आपल्या आई वडिलांच्या ताब्यात दिलं आहे. तसेच तिची समजूत घालण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी तातडीनं केलेल्या तपासामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत अधिक माहिती देताना तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वळीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकीपाडा येथील रहिवासी असणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला हेअर स्टाइल करायची होती. हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून विद्यार्थ्यांचं धक्कादायक कृत्य; ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् आईकडे विनवणी करूनही आईनं केस कापण्यास मनाई केली. आईनं केस कापण्यास मनाई केल्याचं अल्पवयीन मुलीला अतीव दु:ख झालं होतं. यातूनच तिने घरातून पलायन केलं. घरातून मुलगी गायब झाल्यानंतर, आई वडिलांना तिचा सर्वत्र शोध घेतला. मित्र-मैत्रिणींना फोन करून तिच्याबद्दल विचारपूस करण्यात आली. पण संबंधित मुलीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. हेही वाचा-धक्कादायक! शाळेची बस सुटल्याने झाला नाराज; विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल शेवटी घाबरलेल्या आई वडिलांनी वळीव पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात घरातून पळून गेलेल्या मुलीला शोधून काढलं आहे. पोलिसांनी मुलीची समजूत काढून तिला आई वडिलांच्या स्वाधीन केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: