नातवाची उलटी साफ केली नाही म्हणून सुनेने सासूच्या पाठीत भोसकला चाकू

नातवाची उलटी साफ केली नाही म्हणून सुनेने सासूच्या पाठीत भोसकला चाकू

आमरीनने आपल्या सासूला अर्थात सुमय्या यांना ही उलटी साफ करण्यास सांगितले होते.

  • Share this:

मुंबई,5 नोव्हेंबर:नातवाने केलेली उलटी साफ केली नाही म्हणून सुनेने 62 वर्षीय सासूची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील पायधुनी परिसरात घडली आहे. आमरीन इस्माईल कोळसावाला असे आरोपी सूनेचे नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. सुमय्या अफजल कोळसावाला असे मृत महिलेचे नाव आहे. पायधुनीतील कोळसा स्ट्रिट, रॅपीड हाईट्स बिल्डिंगमध्ये रविवारी (3 नोव्हेबर) दुपारी दोन ते चारच्या सुमारास ही घटना घडली.

'मुंबई मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सुमय्या कोळसावाला ही महिलातिच्या कुटुंबियांसोबत रॅपीड हाईट्स बिल्डिंग पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 501 मध्ये राहत होती. तिच्यासोबत तिचा मुलगा इस्माईल, सून आमरीन आणि सात वर्षांचा मुलगा राहतो. सुमय्या ही वयोवृद्ध असल्याने सात वर्षांच्या नातवाचा सांभाळ तीच करीत होती. रविवारी दुपारी दोन वाजता या नातवाने घरात उलटी केली होती. आमरीनने आपल्या सासूला अर्थात सुमय्या यांना ही उलटी साफ करण्यास सांगितले होते. मात्र, सुमय्या यांना उलटी साफ करण्यास नकार दिला. याच कारणावरुन दोन्ही सासू-सूनेत वाद झाला. याच वादातून आमरीन हिने हॉलमधील चाकू थेट सुमय्या यांच्या पाठीत भोसकला. त्यात सुमय्या ही गंभीररीत्या जखमी झाल्या. स्थानिक रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमय्या यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पायधुनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चाकू जप्त केला आहे. आरोपी आमरीन हिला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

'शिवसेना पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जातंय', संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

Published by: Sandip Parolekar
First published: November 5, 2019, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading