वडील गेले होते जिमला.. आईने मुलीची हत्या करून स्वत:ही केली आत्महत्या

श्रुतीचे वडील प्रशांत पारकर हे सकाळी जिमला गेले होते. ते घरी परत आल्यावर घरात प्रवेश करताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलगी श्रुती तर गळफास लावलेल्या अवस्ठेत पत्नी प्रज्ञा दिसली.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 07:49 PM IST

वडील गेले होते जिमला.. आईने मुलीची हत्या करून स्वत:ही केली आत्महत्या

अजित मांढरे, (प्रतिनिधी)

ठाणे, 9 ऑगस्ट- हृदय पिळटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. आईने पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. प्रज्ञा पारकर आणि श्रुती पारकर अशी मृत मायलेकीची नावे आहेत. ठाण्याच्या कळवा येथील गौरी सुमन सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर या मायलेकी राहत होत्या. दोघांचे मृतदेह कळव्यातील प्रमिला रुग्णालयात नेले असून घटनास्थळी कळवा पोलिस पोहोचले आहेत.

वडील जिमला गेले होते..

श्रुतीचे वडील प्रशांत पारकर हे सकाळी जिमला गेले होते. ते घरी परत आल्यावर घरात प्रवेश करताच त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलगी श्रुती तर गळफास लावलेल्या अवस्ठेत पत्नी प्रज्ञा दिसली. घरातील भयावह चित्र पाहून प्रशांत यांना धक्का बसला. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना दिली. माहिती मिळताच कळवा पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, प्रज्ञाने आपल्या पोटची 17 वर्षीय मुलगी श्रुतीची हत्या का केली आणि स्वत:ही आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या घटनेने कळव्यासह ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऑनलाइन 'रम्मी'मध्ये पैसे हरला.. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Loading...

ऑनलाइन रम्मीमध्ये झालेले आर्थिक नुकसान सहन न झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडीत इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (8 ऑगस्ट) घडली. श्रीकृष्ण हरी भोसले (वय-25, रा.हिंगळजवाडी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

श्रीकृष्ण इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. श्रीकृष्णला ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन जडले होते. तो कायम मोबाइलवर 'जंगली' नावाचा रम्मी जुगार खेळत असे. त्यामध्ये तो पैसे हरला होता. आर्थिक नुकसान झाल्याने तो हताश झाला होता. यातून आलेल्या नैराश्यातून श्रीकृष्ण याने पहाटे राहत्या घरात छताला असलेल्या लोखंडी अॅंगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. एएसआय डी.एम चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.या प्रकरणी श्रीकृष्ण याचा चुलत भाऊ धनाजी भोसले याने दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस स्टेशनमध्ये अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

TikTok वर चमकण्यासाठी पठ्याने नदीत मारली उडी, त्यानंतर जे घडलं त्याचा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2019 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...