आमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल

आमदारांचं प्रगतीपुस्तक : शिवसेनेच्या 'या' आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल

. प्रजा फाऊंडेशनने निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर आमदारांवरील असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची आकडेवारी नुसार....

  • Share this:

स्वाती लोखंडे-ढोके,मुंबई, 21 आॅगस्ट : ज्या लोकप्रतिनिधींनी आपण निवडणूक देतो त्यांच्याकडून कामाची अपेक्षा असणे साहजिकच आहे. पण मुंबईतले असे काही आमदार आहे ज्यांच्यावर  गुन्हे दाखल आहे. प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्व्हेमध्ये शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहे. सदा सरवणकर यांचा पहिला नंबर लागला असून त्यांच्या खालोखाल सपाचे वादग्रस्त आमदार अबू आझमी यांचा नंबर लागलाय. तर  भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा तिसरा क्रमांक लागलाय.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कर्तृत्वान आमदारांची यादी जाहीर करण्यात आलीय.  प्रजा फाऊंडेशनने निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर आमदारांवरील असलेल्या फौजदारी गुन्ह्यांची आकडेवारी नुसार सगळ्यात जास्त क्रिमिनल केस असल्याचीही यादीही प्रसिद्ध केली आहे. यात फक्त असे गुन्हेच विचारात घेतले गेलेत ज्यात 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसंच आमदारांनी शपथपत्रात कोणत्या गुन्ह्यांची माहिती दिली. आमदार झाल्यानंतर कोणते गुन्हे दाखल झाले. तसंच किती गुन्ह्याबद्दल आरोपपत्र दाखल झाले याचा विचार केला जातो. यामध्ये शिवसेनेचे दादरचे आमदार सदा सरवणकर यांच्या सर्वाधिक 27 गुन्हे दाखल आहे. त्यांच्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर सर्वाधिक 12 गुन्हे दाखल आहे.

आमदारांवर गुन्हे

1) सदा सरवणकर 27 गुन्हे

2) अबू आझमी 12

3) राम कदम 12

4) प्रकाश मेहता 12

5) अजय चौधरी 9

6) सरदार तारा सिंग 9

आमदारांचं प्रगतीपुस्तक  काँग्रेसचे अमिन पटेल पहिले

मुंबईत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला आहे. गेली 3 वर्ष ते सातत्याने क्रमांक एकवर राहण्याचा बहुमान पटकावलाय. तर भाजपचे आमदार राम कदम यांचा शेवटून पहिला नंबर म्हणजे 32 वा क्रमांकावर आहे.  प्रजा फाऊंडेशन आमदारांचं रिपोर्ट कार्ड जाहीर केलंय. या अहवालानुसार अमीन पटेल हे मुंबईतले क्रमांक एकचे आमदार आहेत. गेली 3 वर्षे सातत्याने ते क्रमांक 1 वर राहण्यात यशस्वी ठरलेत. तर त्यांच्यानंतर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 3 क्रमांकावर  अतुल भातखलकर आहे. घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम हे शेवटच्या म्हणजेच 32 व्या क्रमांकावर आहेत.

टाॅप पाच आमदार

- अमिन पटेल

- सुनील प्रभू

- अतुल भातखळकर

- सुनील शिंदे

- अस्लम शेख

असा केला जातोय सर्व्हे

भारतीय राज्य घटनेमध्ये आमदारांसाठी कामाची नियमावली केली आहे. या नियमावलीनुसार प्रजा फाऊंडेशनने आमदारांचं प्रगतीपुस्तक काढलंय. यामध्ये आमदाराचे काम, विधानसभेत हजेरी, मागील आणि चालू कामाचा आढावा घेतला जातोय. या बद्दल नागरिकांचा सर्व्हे केला जातो. विधानसभेत त्यांनी किती प्रश्न विचारले किती प्रश्न उपस्थितीत केले याबद्दल विचार केला जातो. गुन्हेगारीबद्दल आमदारांवर किती गुन्हे दाखल आहे याचाही विचार केला जातोय. यात 40 टक्के गूण हे जनतेच्या मतांवर आधारीत असतात.

भरधाव वेगात गाडी चालवत होती मुंबईची फॅशन डिझायनर, 100 मीटरपर्यंत चिरडलं महिलेला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 06:57 PM IST

ताज्या बातम्या