मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /तब्बल 1 लाखांहून अधिक लोकांनी काढला रेल्वेचा पास, डोंबिवली आणि बोरिवलीत सर्वाधिक पास विक्री

तब्बल 1 लाखांहून अधिक लोकांनी काढला रेल्वेचा पास, डोंबिवली आणि बोरिवलीत सर्वाधिक पास विक्री

15 ऑगस्टपासून मुंबई लोकल (Mumbai local)पुन्हा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली आहे.  आजपासून  लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

15 ऑगस्टपासून मुंबई लोकल (Mumbai local)पुन्हा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली आहे. आजपासून लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

15 ऑगस्टपासून मुंबई लोकल (Mumbai local)पुन्हा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली आहे. आजपासून लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 16 ऑगस्ट: 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल (Mumbai local)पुन्हा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस (two doses of covid-19 vaccine) घेऊन किमान 14 दिवस उलटलेल्या नागरिकांना मुंबई लोकलनं (Mumbai Local Train) प्रवास करता येत आहे. काल रविवार आणि त्यात 15 ऑगस्ट असल्यानं रेल्वे स्टेशनवर (Railway Station) प्रवाशांची गर्दी झाली नाही. मात्र आजपासून पुन्हा एकदा गर्दी वाढू शकते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेनं आजपासून लोकल फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच 11 ऑगस्टपासून रविवारपर्यंत 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढला आहे. रेल्वेकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

फक्त मासिक पासवर ( pass holders) लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. दररोजच्या प्रवासासाठी तिकीट दिलं जाणार नाही. काल रविवार आणि 15 ऑगस्ट (Independence day) असल्यानं रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी कमी दिसली. आज देखील बँक हॉलिडे असल्यानं गर्दी कमी असू शकते. प्रवाशांची गर्दी मंगळवारपासून वाढण्याची शक्यता आहे. अशातच होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेनं लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

''भारताशी चांगले संबंध हवेत'', तालिबानकडून भूमिका स्पष्ट

सद्यस्थितीत मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर लोकल ट्रेनच्या 1612 फेऱ्या धावताहेत. त्यात वाढ करुन 1686 फेऱ्या दर दिवशी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर 1201 लोकल फेऱ्या होत असून त्या आता 1300 करण्यात आल्यात. वाढ केलेल्या या फेऱ्या आजपासून चालवण्यात येतील.

दरम्यान 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत (दुपारी 4 पर्यंत) लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करून मासिक पास घेणाऱ्यांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 883 झाली. मध्य रेल्वेवर 79 हजार 8 जणांनी तर पश्चिम रेल्वेवर 42189 जणांनी पास काढले आहेत. त्यात मध्य रेल्वेवरील डोंबिवली आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली मधील प्रवाशी यात अव्वल आहेत. डोंबिवलीत एकूण 7 हजार 915 पासची, तर बोरिवलीत 4 हजार 72 पासची विक्री झाली.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Mumbai local