Home /News /mumbai /

COVID-19: राज्यात आजही बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण जास्त, आढळले 9 हजारांपेक्षा जास्त नवे पेशंट

COVID-19: राज्यात आजही बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण जास्त, आढळले 9 हजारांपेक्षा जास्त नवे पेशंट

 त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे.

त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे.

मुंबई कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे आता 78 दिवसांवर गेलं आहे.

मुंबई 2 ऑगस्ट: राज्यात आजही कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. आज दिवसभरात 9,926 रुग्णांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली. तर 24 तासांमध्ये 9,509 नवे रुग्ण सापडले. आज 260 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.53 एवढा आहे. राज्यात 1 लाख 48 हजार 537 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 228 एवढी झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढ असल्याचं दिसते. मात्र महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हा देशात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे देशभर चिंता व्यक्त केली जात होती. आता मात्र सकारात्मक परिणाम दिसत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मुंबई कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे आता 78 दिवसांवर गेलं आहे. हे प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढा व्हायरचा प्रसार कमी होत असल्याचं म्हटलं जातं. नवे रुग्ण वाढण्याचा दर हा आता 0.90 टक्के एवढा खाली आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या एक दिवस आधी काय करत होते अमित शहा, पाहा PHOTOS मुंबईतल्या 24 मधल्या 4 वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर हा 100 दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. तर 2 वॉर्डांमध्ये तो 90 दिवसांवर गेला आहे. तर 6 वॉर्डांमध्ये तो 80 तर इतर 5 वॉर्डांमध्ये तो 70 दिवसांवर गेला आहे. मुंबईतल्या 24 वॉर्डांमधल्या 18 वॉर्ड्समध्ये रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे आता 1 टक्क्यांपेक्षाही कमी झालं आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित COVID-19 पॉझिटिव्ह मुंबईमध्ये धारावीत सुरुवातीच्या काळात मोठी साथ पसरली होती. मात्र मिशन धारावी राबवून ती नियंत्रणात आणली गेली. मुंबईची लोकसंख्या आणि गर्दीचं प्रमाण पाहता देशभर चिंता व्यक्त केली जात होती. तसच केंद्र आणि राज्य सरकारनेही आपलं सर्व लक्ष मुंबईवरच केंद्रीत केलं होतं.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या