दिलासादायक! कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, रुग्णांचा आकडाही घसरला

दिलासादायक! कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, रुग्णांचा आकडाही घसरला

दिवसभरात 3 हजार 75 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर 2.57 एवढा झाला आहे.

  • Share this:

मुंबई 07 डिसेंबर: कोरोनाशी निकराची झुंज देत असलेल्या राज्याला दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोमवारी राज्यात 7 हजार 345 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 17 लाख 30 हजार 715 एवढी झाली आहे. त्यामुळे Recovery Rate 93.28 एवढा झालाय. दिवसभरात 3 हजार 75 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर 2.57 एवढा झाला आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोना लशींसंदर्भात (Covid Vaccine) महत्त्वाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आशा वाढलेली आहे. त्यातच ब्रिटनमध्ये सोमवारपासून लसीकरणालाही सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोना लस कधी उपलब्ध होणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. मोदी सरकारने लसीकरणाला (Coronav Vaccine Launch date in India) परवानगी द्यायचा मुहूर्त ठरवला असल्याची बातमी आली आहे. पुढच्या थोड्याच दिवसांत, 2021 च्या आधीच भारतात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.

CNBC ने दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह वृत्तानुसार, पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) आणि फायझर (Pfizer) या कंपन्यांनी लशीच्या  वापराला परवानगी देण्यासंदर्भात DCGI कडे अर्ज केला आहे.   गरजवंतांना तात्काळ लस देण्याची परवानगी मागणारा हा अर्ज भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे आला असून त्यावर तातडीने विचारविनिमय सुरू आहे. या लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय दोन आठवड्यात होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 7, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या