मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात उच्चांकी रुग्णांनी केली COVID-19वर मात, मृत्यूच्या संख्येतही घट

राज्यात उच्चांकी रुग्णांनी केली COVID-19वर मात, मृत्यूच्या संख्येतही घट

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचं बदललेलं रुप आढळल्याने राज्यात खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचं बदललेलं रुप आढळल्याने राज्यात खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचं बदललेलं रुप आढळल्याने राज्यात खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.

  • Published by:  Ajay Kautikwar
मुंबई 21 डिसेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. सोमवारी (21 डिसेंबर) राज्यात तब्बल 6 हजार 53 रुग्णांनी कोरोनावर मात केली (patients discharged today). गेल्या काही दिवसांमधली ही सर्वात जास्त संख्या आहे. आत्तापर्यंत राज्यात 17,89,958 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा Recovery rate हा 94.24वर गेला आहे. तर दिवसभरात 2,834 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या 24 तासांमध्ये 55 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.57 झाला आहे. तर कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 18,99,352 एवढी झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचं बदललेलं रुप आढळल्याने राज्यात खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते. कोरोनातून बरं झालेल्या 10 टक्के रुग्णांना होते Long Covid ची लागण संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या