मुंबई 29 जून : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5257 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा 1,69,883 झाला आहे. तर आज 181 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 7610 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 73298 एवढे Active रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज 71 जणांचा मृत्यू झाला तर 1226 नवे रुग्ण सापडले. सलग चौथ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे.
राज्यात लॉकडाउन वाढला
महाराष्ट्रत लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. Unlock झाल्याने गर्दी वाढली असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. (Lockdown in Maharashtra Extended)
MMR परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.
पंढरपुरात उद्यापासून संचार बंदी, केवळ 'या' लोकांनाच मिळणार मंदिरात प्रवेश
अत्यावश्यक सेवेसाठी लोकांना जाता येईल. मात्र अनावश्यक गर्दी करता येणार नाही. व्यवहार सुरू ठेवण्यासा परवानगी दिली असली तरी सर्व नियमांचं पालन करणं सक्तिचं करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हे सक्तिचं करण्यात आलं आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी लोकांना जाता येईल. मात्र अनावश्यक गर्दी करता येणार नाही. व्यवहार सुरू ठेवण्यासा परवानगी दिली असली तरी सर्व नियमांचं पालन करणं सक्तिचं करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हे सक्तिचं करण्यात आलं आहे.
जिल्ह्यांतर्गत व्यवहारांना परवानगी दिलेली आहे. मात्र अजुनही जिल्हाबंदी कायम असून विनापरवाना प्रवास करता येणार नाही.
सलून, स्पा, ब्युटी पार्लर यांनी नियमांचं पालन करतच दुकाने सुरू करावीत असेही नव्या आदेशात म्हटलं आहे. लग्नासाठीही पूर्वीचेच नियम लागू होणार आहेत.
हे वाचा- 24 तासांतील महाराष्ट्र पोलिसांतील बाधितांचा धक्कादायक आकडा; 2 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईसह ठाण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिकेनंही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात
1 ते 11 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत 11 जूनपर्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल आणि दुध डेअरी सुरू राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus