सलग आठ दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ, मृत्यूची संख्या कमी करण्याचं आव्हान कायम

सलग आठ दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ, मृत्यूची संख्या कमी करण्याचं आव्हान कायम

दिवसभरात 75 जणांचा मृत्यू झालाय. रुग्ण संख्या कमी झालेली असताना मृत्यूचा आलेख निच्चांकी पातळीवर आणण्याचं आव्हान अजुनही कायम आहे.

  • Share this:

मुंबई 9 डिसेंबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सलग 8 दिवसांपासून ही संख्या वाढलेली आहे. बुधवारी (9 डिसेंबर) 5 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही  17 लाख 42 हजार 191 एवढी झालीय. तर 4 हजार 981 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्याही 18 लाख 64 हजार 348 एवढी झाली आहे. दिवसभरात 75 जणांचा मृत्यू झालाय. रुग्ण संख्या कमी झालेली असताना मृत्यूचा आलेख निच्चांकी पातळीवर आणण्याचं आव्हान अजुनही कायम आहे. त्यासाठी काय करता येईल यावर आता आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलं आहे.

यूकेमध्ये कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापराला (Emergency Use Authorization) मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही कोरोना लस (corona vaccine in india) उत्पादक कंपन्यांनी आपल्या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज केले होते. मात्र भारतात कोरोना लशीला आपात्कालीन वापराला मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण या अर्जावर सध्या विचार केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतात हैदराबादमधील भारत बायोटेकनं (Bharat Biotech) कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटने (Serum Institute of India) कोव्हिशिल्ड या कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यावी यासाठी अर्ज केला होता. भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे ही मागणी करण्यात आली आहे.

या लशींचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. लशीच्या सुरक्षिततेबाबत पुरेसा डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे आपात्कालीन वापराबाबत डीजीसीआय अद्याप तरी विचार करणार नाही, अशी माहिती मिळते आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 9, 2020, 8:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या