COVID-19: राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, धोका पुन्हा वाढला

COVID-19: राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, धोका पुन्हा वाढला

महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकमध्येही रुग्णांमध्ये थोडी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई 20 नोव्हेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या (Covid-19 patient in maharashtra ) संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही वाढ कायम आहे. दररोज 3 हजारांच्या आसपास वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आता 5 हजारांच्या वर वाढताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात 5 हजार 640 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 6 हजार 945 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 16 लाख 42 हजार 916 झाली आहे.     Recovery Rate 92.89 एवढा झाला आहे. दिवसभरात 155 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

दिवाळीची गर्दी आणि दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यातल्या पुणे आणि इतर शहरांमध्येही रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकमध्येही रुग्णांमध्ये थोडी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिवीरचा (Remdesivir) कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर न करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिला आहे. रुग्णांची परिस्तिथी कितीही खराब असली तरीही या औषधाचा वापर न करण्याचे डब्लूएचओने म्हटले आहे. रुग्णांच्या आरोग्यावर याचा कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याने या औषधाचा वापर थांबवण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिला आहे.

शिवसेनेच्या वचननाम्याची होळी... आप आदमी पक्षानं ठाकरे सरकारवर साधला निशाणा

सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरलेल्या काही उपचारांचे परिणाम डब्ल्युएचओच्या  Guideline Development Group (GDG) या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीने अभ्यासले. सध्याच्या डेटावरून असा कोणताच पुरावा आढळून आला नाही की, ज्यामुळे कोरोना रुग्णाची स्थिती सुधारते आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी हे उपचार करू नयेत असा सल्ला दिला आहे. या तज्ञांच्या मते  रेमडेसिवीरच्या सकारात्मक परिणामाचा कोणताही डेटा मिळाला नसून रुग्णाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत असल्याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 20, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या