सलग दुसऱ्या दिवशी COVID-19 रुग्णांमध्ये वाढ, मृत्यूची संख्याही 154 वर

राज्यात महिनाभरापासून रुग्णसंख्या कमी होत होती. दररोज नव्या रुग्णांची संख्या ही 3 हजारांच्या आसपास तर मृत्यू संख्या ही 100च्याही खाली आली होती.

राज्यात महिनाभरापासून रुग्णसंख्या कमी होत होती. दररोज नव्या रुग्णांची संख्या ही 3 हजारांच्या आसपास तर मृत्यू संख्या ही 100च्याही खाली आली होती.

  • Share this:
    मुंबई 19 नोव्हेंबर: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असली तरी नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही नव्या रुग्णांची संख्या ही पाच हजारांच्या वर गेली आहे. दिवसभरात 5,535 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 5,860 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 154 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 17,63,055 वर गेलीय तर एकूण 16,35,971 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यात आत्तापर्यंत 46,356 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात महिनाभरापासून रुग्णसंख्या कमी होत होती. दररोज नव्या रुग्णांची संख्या ही 3 हजारांच्या आसपास तर मृत्यू संख्या ही 100च्याही खाली आली होती. मात्र दिवाळीनंतर आता त्यात वाढ होत असल्याचं आढळून येत आहे. राज्यातल्या इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबाद (Ahmadabad city) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. तर कोरोनाचा(Covid-19) मुकाबला करण्यासाठी 300 डॉक्टर्स आणि मेडिकलच्या 300 विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर 20 रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत. शहरात सध्या 2600 बेड्स खाली आहेत. लोकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. अहमदाबाद हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: