Home /News /mumbai /

कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, उपचार घेत असलेल्यांची संख्या 60 हजारांवर घसरली

कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, उपचार घेत असलेल्यांची संख्या 60 हजारांवर घसरली

COVID: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घसरत आहे. दिवाळीनंतर त्यात थोडी वाढ झाली होती. मात्र नंतर लगेच ती संख्या घसरणीला लागली आहे. सलग त्यात घसरण होत असल्याने सकारात्मक संकेत मिळत आहेत.

    मुंबई 17 डिसेंबर: राज्यात कोरोना रुग्णांच्या (COVID-19) संख्येत मोठी घट झाली आहे. दररोज  बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या ही खाली आली असून राज्यात सध्या 60 हजार 905 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी 4 हजार 358 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत तर 3 हजार 880 नव्या रुग्णांची भर पडली. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ही 17 लाख 74 हजार 255 एवढी झालीय. तर तर कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 18 लाख 84 हजार 773 झाली आहे. राज्याचा Recovery Rate 94.14 वर गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 65 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घसरत आहे. दिवाळीनंतर त्यात थोडी वाढ झाली होती. मात्र नंतर लगेच ती संख्या घसरणीला लागली आहे. सलग त्यात घसरण होत असल्याने सकारात्मक संकेत मिळत आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वेग मंदावला असल्याचे संकेत आहेत. मात्र धोका टळलेला नाही असं सरकारकडून सातत्याने सांगितलं जात आहे. कोरोना लसीकरणासाठी सरकारनं मायक्रो प्लॅनिंग केलं असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्याला मेसेज येणार त्याला कोरोना लस देणार, असंही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोना लस देण्यासाठी विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे. त्या व्यक्तीला मेसेज मिळेल. तो सेंटरवर येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. साधारण दोन कंपन्या सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लशीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत केंद्रानं परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरू होईल, असं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्य सरकार लसीकरण कार्यक्रमसाठी सज्ज आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या