Home /News /mumbai /

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 19 लाखांच्या जवळ, तर Recovery Rate गेला 94 टक्क्यांवर

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 19 लाखांच्या जवळ, तर Recovery Rate गेला 94 टक्क्यांवर

1 कोरोनाच्या तिसऱ्या लाटे (Third Wave of corona) चा धोका लहान मुलांना (Children at risk) जास्त असणार आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट लहान मुलांवर जास्त अटॅक करणार आहे असं वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)चं मत आहे. जगात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 8 टक्के मुलांना इन्फेक्शन झालं होतं. काही मुलं हॉस्पिटलमध्ये न जाताच बरीही झाली. तर, दुसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त प्रभाव दिसला. आतातर, तिऱ्या लाटेत लहान मुलांना खुप जपावं लागणार आहे.

भारतातील मृत्यू दर जगातील सर्वात कमी आहे, जो 1.45 टक्के आहे. संपूर्ण भारतात 16 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

  मुंबई 19 डिसेंबर: राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या ही आता 19 लाखांच्या जवळ गेली आहे. शनिवारी राज्यात 3 हजार 940 रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या ही 18 लाख 92 हजार 707वर गेली आहे. दिवसभरात 3 हजार 119 रुग्णांन कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 17 लाख 81 हजार 841 एवढी झालीय.  कोरोना रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात आहे त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 94.14वर गेलं आहे. शनिवारी 75 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.57वर पोहोचला आहे. देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीतही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, भारताचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक 95.46 टक्के आहे. देशात आज कोरोना रुग्णांची संख्या  1 कोटीपर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांना घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यात सांगितलं की, स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे आणि आमच्याकडे 30 कोटी लशीकरणाची क्षमता असेल.  भारतातील मृत्यू दर जगातील सर्वात कमी आहे, जो 1.45 टक्के आहे. संपूर्ण भारतात 16 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासह त्यांनी सांगितले की, आमची वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञ ही लस बनवण्याचे काम करत आहेत. या संदर्भात, जीनोम सिक्वेंसींग, कोरोना व्हायरस आयसोलेशन आणि स्वदेशी लस विकसित करण्यात आली आहे. ज्या 6 ते 7 महिन्यांत भारतात 300 दशलक्ष लोकांना लस देण्यास सक्षम असतील.राज्याबद्दल सांगावयाचे झाल्यास येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी 4 हजार 467 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 17 लाख 78 हजार 722 एवढी झालीय. Recovery Rate 94.17वर गेला आहे. तर 3 हजार 994 नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ही 18 लाख 88 हजार 767 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 75 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.57 एवढा झाला आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या