कोरोनामुक्त रुग्णांमध्ये घट, तर राज्यातल्या बाधितांची संख्या गेली 18 लाख 80 हजारांवर

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये घट, तर राज्यातल्या बाधितांची संख्या गेली 18 लाख 80 हजारांवर

राज्यात आजपर्यंत 1 कोटी 17 लाख 2 हजार 457 एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या असून 16.07 टक्के जणांचे निकाल हे पॉझेटिव्ह आले आहेत.

  • Share this:

मुंबई 13 डिसेंबर: राज्यात कोरोनामुक्त (Covid-19) होणाऱ्यांमध्ये रविवारी थोडी घट बघायला मिळाली. गेली काही दिवस राज्यात 5 हजरांच्या आसपास रुग्ण बरे होत होते. दिवसभरात 3 हजार 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण 93.44 टक्के एवढं असून एकूण संख्या ही 17 लाख 57 हजार एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 717 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 80 हजार 416 एवढी झाली आहे. दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.56 वर गेला आहे.

राज्यात आजपर्यंत 1 कोटी 17 लाख 2 हजार 457 एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या असून 16.07 टक्के जणांचे निकाल हे पॉझेटिव्ह आले आहेत. राज्यातल्या उपचाराधिन रुग्णांची संख्या घटली असून सध्या 74 हजार 104 जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, यूकेमध्ये कोरोना लशीचा आपत्कालीन वापर (Emergency Use Authorisation) सुरू झाल्यानंतर भारतातही तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (Serum Institute of India). सीरमनं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी  ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच DCGI कडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल अशी खूशखबर अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनी दिली आहे.

कोरोनापाठोपाठ आणखी एका गूढ आजाराचा धुमाकूळ, 600 जणांना बाधा

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने विकसित केलेली कोरोना प्रतिबंधक लस तातडीने वापरण्याची परवानगी डिसेंबरअखेरपर्यंत मिळण्याबद्दल संस्थेचे सीईओ आदर पूनावाला आशावादी आहेत. "आम्हाला इमर्जन्सी लायसेन्स (Emergency License) चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल; पण लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो, असा विश्वास आम्हाला आहे", असं अदार पूनावाला यांनी सांगितलं.

सुरुवातीला देशाच्या किमान 20 ते 30 टक्के लोकसंख्येला लस देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियोजन करत आहे. तेवढा टप्पा पार पडल्यावर आपल्याला समाजात आत्मविश्वास दिसू लागेल, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. सरकारला जुलै 2021 पर्यंत लशीचे 30 ते 40 कोटी डोस हवे असल्याचंही पूनावाला यांनी नमूद केल्याचं ‘मनीकंट्रोल डॉट कॉम’च्या बातमीत म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 13, 2020, 7:20 PM IST

ताज्या बातम्या