मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आठवडाभरात पहिल्यादांचा घसरली कोरोना रुग्णांची संख्या, उपचार घेणाऱ्यांचा आकडा 90 हजारांच्या वर

आठवडाभरात पहिल्यादांचा घसरली कोरोना रुग्णांची संख्या, उपचार घेणाऱ्यांचा आकडा 90 हजारांच्या वर

सर्व देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आला कमी होत आहे. सलग गेल्या महिनाभरापासून आलेख उतरणीला लागला आहे.

सर्व देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आला कमी होत आहे. सलग गेल्या महिनाभरापासून आलेख उतरणीला लागला आहे.

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 16 लाख 85 हजारांपेक्षा जास्त असून त्याचं प्रमाण हे 92.39 टक्के एवढं झालं आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 30 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या (Coronavirus) नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी मात्र गेल्या आठ दिवसांमध्ये पहिल्यांदाचा कोरोना रुग्णांची संख्या घसरली आहे. दिवसभरात 3 हजार 800 करोना रुग्णांची नव्याने भर पडली तर 4 हजार 800 रुग्ण बरे झाले. दिवसभरात 80 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 16 लाख 85 हजारांपेक्षा जास्त असून त्याचं प्रमाण हे 92.39 टक्के एवढं झालं आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 24 हजारांच्या जवळ गेली आहे.

कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुप्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात "संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान" उद्यापासून 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे 8 कोटी 66 लाख 25 हजार 230 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात ग्रामीण भागातील संख्या 6 कोटी 82 लाख 23 हजार 398 एवढी असून जोखीमग्रस्त शहरी लोकसंख्या 1 कोटी 84 लाख एवढी आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna Inc.) कंपनीनं आपल्या कोरोना लशीच्या (Corona vaccine) क्लिनिकिल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील अहवाल जारी केला आहे. ट्रायलमध्ये आपली लस 94.1% परिणामकारक असल्याचं मॉडर्नानं सांगितलं आहे. तर गंभीर कोरोनावर ही लस 100 टक्के प्रभावी ठरली आहे, असा दावाही केला आहे.

तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार CORONA VACCINE? एका क्लिकवर पाहा मोदी सरकारचा प्लॅन

मॉडर्नानं तिसऱ्या टप्प्यात 30,000 लोकांवर आपल्या लशीची चाचणी केली. त्यामध्ये  196 कोव्हिड 19 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 30 रुग्ण गंभीर होते. आणि या रुग्णांवर ही लस 100 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं. लस 94.1% परिणामकारक असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याआधी मॉडर्नानं 16 नोव्हेंबरला या चाचणीचा अंतरिम अहवाल सादर केला होता. त्यामध्ये आपली लस 94.5 टक्के परिणामकारक असल्याचं म्हटलं होतं. आता जारी केलेल्या रिपोर्टमध्ये हा परिणाम थोडा कमी म्हणजे 94.1% आहे. पण फारसा फरक नाही आहे.

First published:

Tags: Coronavirus