राज्यात निचांकी मृत्यूची नोंद, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या गेली 16 लाख 18 हजारांवर
राज्यात निचांकी मृत्यूची नोंद, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या गेली 16 लाख 18 हजारांवर
महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कोरोनाचा आलेख (Maharashtra Covid-19 graph) कमी होतोय. त्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार आणि स्थानिका पालिकांनी मिळून जे सातत्याने काम केलं त्यामुळे हा आलेख घसरत असून त्याची 5 महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे (Recovery Rate) 92.49 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या 84 हजार 386 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई 16 नोव्हेंबर: राज्यात घसरत चाललेला कोरोनाचा आलेख कायम आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये पहिल्यांदाच निचांकी मृत्यूची नोंद झाली. सोमवारी (16 नोव्हेंबर) 60 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 3,001 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 16,18,380 एवढी झाली आहे. तर 2,535 नवे रुग्ण आढळून आलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे (Recovery Rate) 92.49 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या 84 हजार 386 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जगातले अनेक देश यावर संशोधन करत असून अनेक लशींच्या चाचण्या या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लस शोधल्याचा दावा करणारा रशिया हा पहिलाच देश आहे. मात्र रशियाच्या लशीवर जगाने आणि वैज्ञानिकांनी फारसा विश्वास दाखवला नाही.
ऑक्सफर्ड शोधत असलेल्या लशींवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून आत्तापर्यंतचे सगळे निष्कर्ष हे उत्साहवर्धक आणि सकारात्मक आहेत. पुण्यातली सीरम या लशींचं उत्पादन करणार आहे.
श्रीमंत देशांनी या लशींच्या उत्पादनाला सुरूवातही केली आहे. प्रचंड पैसा आणि तुलनेने कमी लोकसंख्या असल्याने या देशांनी आत्तापासूनच त्या लशींचं बुकिंग आणि साठवणूक सुरू केली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे.
तर भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि विकसनशील देशांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर गरीब देशांची परिस्थिती आणखी गंभीर आहे. भारताला प्रत्येक नागरीकाला एक डोज द्यायचा द्यायचा असेल तर किमान 130 कोटींपेक्षा जास्त डोज लागणार आहेत. त्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पादन हे मोठं आव्हान असणार आहे.
हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.