Home /News /mumbai /

मोठी बातमी! गेल्या 24 तासांत 131 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग तर दोघांचा मृत्यू

मोठी बातमी! गेल्या 24 तासांत 131 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग तर दोघांचा मृत्यू

आतापर्यंत एकूण 22 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 897 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

    मुंबई, 28 मे: कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत आणखी 131 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा...  विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता खैर नाही, या शहरात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात संपूर्ण राज्यात आतापर्यंत 2095 पोलिस कोरोनाबाधित आहेत. यात 236 पोलिस अधिकारी आणि 1859 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 22 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 897 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यात कायदा व सुव्यवस्थेचे काम करणाऱ्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ लागला आहे. कोरोनाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या कोरोना वीरांना या धोकादायक विषाणूंची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. BMC च्या 1529 कर्मचाऱ्यांना कोरोना बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) 1529 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे 25 कर्मचाऱ्यांनी प्राण गमावला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा बीएमसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. दिवसभरात 105 जणांचा मृत्यू राज्यात बुधवारी एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले. 105 मृत्यूंसह मृतांची एकूण संख्या 1897 वर गेली आहे. 2190 नव्या रुग्णांसह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा रुग्णांची एकूण 56,948 वर गेला. राज्यात 964 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले असून बरे होणाऱ्यांची संख्या 17,918 झाली आहे. राज्यात 37,125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हेही वाचा...लॉकडाऊननंतर स्थिरस्थावर व्हायला 9 ते 12 महिने लागतील, नवा अहवाल आला समोर मुंबईत दिवसभरात 1002 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही 32 हजार 974 वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1065 वर पोहोचली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या