मुंबई 01 जानेवारी : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेल नाराजी नाट्य वाढतच आहे. आघाडीचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार झाला. आणि आता बहुचर्चित खातेवापाची प्रतिक्षा आहे. मात्र पदांची आणि खात्यांची वाटणी करण्यात स्पर्धा असल्याने मंत्रिमंडळाचं खातेवाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सगळ्याच पक्षांना महत्त्वाची खाती हवी आहेत. ही मलाईदार खाती मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात शिवसेनेचे तब्बल 12 पेक्षा जास्त आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यावेळी दिवाकर रावते, रामदास कदम, दिपक केसरकर यांच्यासारख्या अनेक दिग्गज आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. तर अनेक ज्येष्ठ आमदारही नाराज आहेत. ओवळा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यांनी स्पष्टपणे नाराजी बोलूनही दाखवली होती. त्यामुळे या सर्व नाराजांना शांत कसं करायचं असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पडलाय.
महाविकास आघाडीचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार झाला. आणि आता बहुचर्चित खातेवापाची प्रतिक्षा आहे. मात्र पदांची आणि खात्यांची वाटणी करण्यात स्पर्धा असल्याने मंत्रिमंडळाचं खातेवाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सगळ्याच पक्षांना महत्त्वाची खाती हवी आहेत. ही मलाईदार खाती मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बुधवारी यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाली मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. महत्त्वाची खाती, पालकमंत्रीपदं, बंगले, दालनांचं वाटप या सगळ्याच गोष्टींवर तीनही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे प्रत्येक निर्णयासाठी तीनही पक्षांची मतं विचारात घेऊन पुढे जाण्याचं शिवधनुष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यापुढच्या काळात पेलावं लागणार आहे.
आज महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची खातेवाटपाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकासआघाडी सरकार हे तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून स्थापन केले आहे. त्यामुळे खातेवाटपाबाबत पक्षानुसार सविस्तर चर्चा झाली. खातेवाटपाबाबत जवळपास निर्णय झाला आहे. याची घोषणा उद्यापर्यंत होईल असं मला वाटतंय. शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील, असं अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खाटेवाटपाची यादी ही शरद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, याबद्दल ते अंतिम निर्णय घेतील, असंही अजितदादांनी सांगितलं. तसंच या बैठकीमध्ये पालकमंत्री वाटपाबद्दलही चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.