मंत्रालयाला कोरोनाचा विळखा, धक्कादायक आकडेवारी आली समोर

मंत्रालयाला कोरोनाचा विळखा, धक्कादायक आकडेवारी आली समोर

गेल्या आठवड्यात 4 शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या पॉझिटिव्ह असलेले यात कक्ष अधिकारी, सहसचिव, उपसचिव, क्लार्क सचिव दर्जाचे अधिकारी आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : महाराष्ट्रामध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दररोज साठ हजाराच्या आसपास सापडत आहे. राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाला (mantralaya) सुद्धा आता कोरोनाचा विळखा पडला आहे. मंत्रालयात तब्बल 100 हुन अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मंत्रालयात अनेक अधिकारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. विशेष म्हणजे, मंत्रालयात गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकांना मंत्रालय प्रवेश बंद केला आहे. तरी देखील अनेक अधिकारी पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ही MPV, सिंगल चार्जवर धावणार 522 KM

यासंदर्भात अधिकारी महासंघाचे सरचिटणीस विष्णू पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, 'मंत्रालयात शंभरपेक्षा अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असून अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे सुद्धा सांगत नाहीत'.

मोठी बातमी, वैद्यकीय समितीचा निर्णय राज्यपालांकडून 5 महिन्यांपासून प्रलंबित!

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या विभागात अव्वल कारकूनापासून ते सचिव दर्जाचे अधिकारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व कर्मचारी स्वतंत्र विलगीकरण तर काहीजण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती देखील पाटील यांनी दिली आहे.

मंत्रालयात कुठल्या विभागात किती रुग्ण?

महसुल विभाग -17

गृह - 4

शालेय शिक्षण - 7

नियोजन -6

मृदा जंलसंधारण - 7

आदिवासी विकास -6

पर्यटन - 6

अल्पसंख्यक - 3

सार्वाजनिक बांधकाम -8

एमपीएससी विभागात 24 आणि  जलसंपदा विभाग 12पेक्षा जास्त शासकीय कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आहेत.

गेल्या आठवड्यात 4 शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सध्या पॉझिटिव्ह असलेले यात कक्ष अधिकारी, सहसचिव, उपसचिव, क्लार्क  सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. सध्या मंत्रालयात  50 टक्के शासकीय कर्मचारी उपस्थिती आहे. मागिल काही दिवसांपूर्वीच मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील वर्षी ज्या प्रमाणे लॉकडाऊन जाहीर केल्या नंतर न कर्मचारी उपस्थिती 20 टक्‍क्‍यांपर्यंत आणली होती, तसाच नियम काही दिवस आणावा, यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात जाणार नाही आणि त्यांच्यावरील संकट कमी होईल.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ही MPV, सिंगल चार्जवर धावणार 522 KM

तूर्तास राज्यात सर्वत्रच कडक नियमावली सुरू असल्याने मंत्रालयात देखील अनेक जण येत नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना काही दिवस मुभा मिळावी अशी मागणी केल्याचे देखील अधिकारी महासंघाचे सरचिटणीस विष्णू पाटील यांनी सांगितले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंदे यांच्याशी विचारणा केली असता 'मंत्रालयात अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत, ही वस्तुस्थिती आहे यामुळेच अनेक मंत्री आता मंत्रालयात जात नाहीत, त्यांच्या शासकीय निवासस्थानातून किंवा इतर ठिकाणावरून कामकाज करत आहेत. जेणेकरून लोकांची गर्दी मंत्रालयात होणार नाही' असे मत नोंदवले आहे.  मंत्रालयात मागील दोन वर्षात सुमारे 17 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Published by: sachin Salve
First published: April 15, 2021, 10:26 PM IST
Tags: corona

ताज्या बातम्या