मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्यासाठी चिंतेची बातमी, omicron पेक्षा कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटचा जास्त धोका!

राज्यासाठी चिंतेची बातमी, omicron पेक्षा कोरोनाच्या 'या' व्हेरिएंटचा जास्त धोका!

 297पैकी 19 रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

297पैकी 19 रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

297पैकी 19 रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

मुंबई, 15 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या (corona) नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (omicron) राज्यात चिंतातूर वातावरण आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. पण, दुसरीकडे कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत 6 व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहे. एकूण 297 नमुन्यांमध्ये 35 टक्के डेल्टा व्हेरिअंट, 62 टक्के डेल्टा डेरिव्हेटीव्ह (Delta Derivatives), 2 टक्के ओमायक्रॉन आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालक करण्याची सूचना प्रशासनाने दिली.

‘कोविड - 19’ विषाणूच्या जनुकीय सुत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट 2021 पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)  सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत सहाव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत.

यानुसार २९७ कोविड बाधित नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. या फेरीतील चाचण्यांचे वेगळेपण म्हणजे यावेळी प्रथमच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधील नमूने देखील या चाचण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. एकूण २९७ नमुन्यांपैकी ६२% अर्थात १८३ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकाराने; तर ३५% अर्थात १०५ नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत. तसेच २% म्हणजेच ७ नमुने हे ओमायक्रॉन या उप प्रकाराने व उर्वरित १% नमुने हे इतर उप प्रकारांनी बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

हेही वाचा - गुलाबी थंडीत कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मुंबईच्या जवळची ही ठिकाणे सर्वोत्तम

कोविड विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणूच्या 2 किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.

नुकत्याच हाती आलेल्या ६ व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, २९७ रुग्णांपैकी ३५% म्हणजेच १०३ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. या खालोखाल २७% म्हणजेच ८० रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील; तर २३% म्हणजेच ६८ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत.

हेही वाचा - विराटनंतर अनुष्कालाही बसला मोठा धक्का, क्रिकेटच्या मैदानातून आली अपटेड

याच निष्कर्षांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, २९७ पैकी १९ रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी ३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तथापि, यापैकी कोणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही किंवा अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले नाही.   लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १९४ रुग्णांपैकी ३३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली, तर दुस-या एका रुग्णाला अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी ८४ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी २२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.

First published: