खुशखबर! देशात 1 जूनला होणार मान्सूचं आगमन, भीषण उकाड्यापासून होणार सुटका

खुशखबर! देशात 1 जूनला होणार मान्सूचं आगमन, भीषण उकाड्यापासून होणार सुटका

केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळेत आगमन होतं. त्यावर पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते.

  • Share this:

मुंबई 28 मे: कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती असताना एक दिलासादायक माहिती समोर आलीय. देशात मान्सूनचं आगमन 1 जूनला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सन वेळेवर आला तर भीषण उकाड्यापासून सुटका होणार आहे. सध्या देशातल्या जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये भीषण गर्मी आहे.  अनेक ठिकाणी पारा 47 डिग्रीच्या जवळ गेला आहे. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. मान्सून वेळेवर असला तर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाणार आहे.

देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. हवामान खात्याने याही वर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. सध्याची वातावरणाची परिस्थिती अनुकूल असल्याने मान्सून वेळेवर येईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

दक्षित पश्चिम मान्सून अंदमान समुद्रासह जवळपासच्या परिसरात दाखल झाला आहे. केरळमध्ये 1 ते 5 जून पर्यात मान्सून दाखल होईल तर महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनचा सध्याचा प्रवास पाहता हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेळेत दाखल होईल असं सांगण्यात येत आहे.

भाजपच्या या फ्रायरब्रँड प्रवक्त्यालाही कोरोनाची लक्षणं, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळेत आगमन होतं. त्यावर पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात गेल्या काही वर्षात सातत्यानं बदल होत आहेत.

विद्यार्थ्यांनी 11 लाख जमा करुन मुंबईतील 174 मजुरांना विमानाने पाठवलं गावी

तुर्तास नियोजित ज्या तारीख हवामान खात्याच्या मान्सून प्रवास जाहीर केल्या त्यानुसार मान्सून प्रवास सुरू आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून पाऊस सामान्य होईल. त्यानुसार 2020 मध्ये मान्सून सरासरीच्या 100 टक्के म्हणजे चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

 

First published: May 28, 2020, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading