मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Monsoon Update: राज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Update: राज्यात मान्सूनचा जोर वाढला; 3 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Weather Forecast: मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पुढील काही तासांत मुंबईत कधीही मान्सूनचं (Monsoon in Mumbai) आगमन होऊ शकतं.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 09 जून: महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून (Monsoon in Maharashtra) दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार (rain) पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनचं मुंबईत अनेक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी (Rain in Mumbai) कोसळत होत्या. यानंतर आता पुढील तीन तासांत मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्यानं (IMD) दिला आहे.

खरंतर, सध्या मान्सूनने महाराष्ट्रात दक्षिण भागासह पुणे, रायगड, अलिबाग या परिसरात धडक मारली आहे. आता मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पुढील काही तासांत मुंबईत कधीही मान्सूनचं (Monsoon in Mumbai) आगमन होऊ शकतं. असं असताना मागील तीन दिवसांपासून मुंबईला पूर्व मोसमी पावसानं झोपडून काढलं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते तुंबल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यावर्षी देशात 101 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

असं असताना मान्सून दाखल होण्यापूर्वीच मुंबईची तुंबई व्हायला सुरुवात झाली आहे. मागील 12 तासांत मुंबईत 140 ते 160 मिली इतका पाऊस झाला. तर 24 तासांत 500 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची पुरती धांदल उडाली आहे. यानंतर आता पुढील तीन तासांत आणखी पावसाची तीव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा-पहिल्याच पावसात मुंबई झाली 'तुंबई', रेल्वे स्थानकाची झाली नदी, पाहा हा VIDEO

पुढील तीन तासात मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

First published:

Tags: Maharashtra, Monsoon, Mumbai, Weather forecast, Weather update