पुणे, चंद्रकांत फुंडे, 27 जून : राज्यात मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली असली तरी अपेक्षित पाऊस मात्र पडताना दिसत नाही. मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा, विदर्भात दोन दिवसापूर्वी जोरदार पावसानं हजेरी लावली पण, शेतीपूरक असा पाऊस पडताना दिसत नाही. पाऊस लांबल्यानं आता राज्यातील धरणांनी तळ गाठला असून सारी मदार ही पावसावर आहे. वायू चक्रीवादळाचा परिणाम देखील पावसावर झाला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून 1 ते 4 जुलै दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. तसंच मध्य भारतात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. तर, आज मुंबई आणि कोकणात रिमझिम पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं वर्तवला आहे.
केवळ 500 रूपयांसाठी पतीनं केली पत्नीची हत्यामुंबईत पाऊस नाही
मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचं वातावरण आहे. पण, पाऊस मात्र गायब आहे. वातावरणातील उकाडा देखील वाढला आहे. पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठा कमी झाला असून आता सारी मदार ही पावसावर आहे. तर, केवळ 20 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्यानं पाऊस न झाल्यास पाणीकपातीचा कठोर निर्णय प्रशासनाला घ्यावा लागेल.
सकाळपासून मुंबईतील काही भागांमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे. पण, पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 ते 4 जुलै दरम्यान मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात देखील चार दिवसांपूर्वी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली होती. पण, आता मात्र पावसानं पाठ फिरवली आहे.
VIDEO: अख्खी एक्स्प्रेस ट्रेन अंगावरून गेली मात्र त्याला खरचटलं सुद्धा नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.