Monsoon Update: मुंबईत 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जीर्ण इमारती रिकाम्या करण्याचा आदेश

Weather In Mumbai: आज सकाळपासूनचं मुंबईतही मुसळधार पावसाला सुरुवात (Rain In Mumbai) झाली आहे. पुढील आणखी तीन दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather In Mumbai: आज सकाळपासूनचं मुंबईतही मुसळधार पावसाला सुरुवात (Rain In Mumbai) झाली आहे. पुढील आणखी तीन दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

  • Share this:
    मुंबई, 08 जून: केरळात मान्सून (Monsoon in kerala) दाखल झाल्यापासून देशात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसानं जोर धरला आहे. मागील 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रात दक्षिणेत मान्सूनच्या पावसाने तर उत्तरेत पूर्व मोसमी पावसाने (Pre monsoon rain) जबरदस्त तडाखा दिला आहे. त्याचबरोबर आज सकाळपासूनचं मुंबईतही मुसळधार पावसाला सुरुवात (Rain In Mumbai) झाली आहे. पुढील आणखी तीन दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे मुंबईत पडझडीच्या घटना घटू शकतात, त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशाराही आपत्ती विभागाकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानं पुढील 3 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील जीर्ण झालेल्या, मोडखळीस आलेल्या इमारती रिमाक्या करण्याचा आदेशही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. परिणामी मुंबईकरांच्या चिंता वाढताना दिसत आहेत. सध्या मान्सूनने पुण्यासह अलिबाग आणि रायगडपर्यंत मजल मारली असली तरी अद्याप मुंबईत मान्सूनच आगमन झालेलं नाही. आज मुंबईसह राज्यात विविध जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, तो पूर्व मोसमी पाऊस असल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक जयंता सरकार टीटी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुण्यापासून अलीबाग आणि रायगडपर्यंत धडक मारली आहे. तर 10 जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याची माहितीही जयंता सरकार यांच्याकडून देण्यात आली आहे. हे ही वाचा- Monsoon News : मुंबईतही पोषक वातावरण, दोन दिवसांत मान्सून पोहोचण्याची शक्यता मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर 11, 12, 13, 14 आणि 15 जून रोजी शहरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत आजही बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांनाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याव्यतिरिक्त कोकणातही विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: