मुंबई, 11 ऑगस्ट: हवामान खात्याच्या सुधारीत अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता वर्तवण्यात आली होती. पण अद्याप राज्यात अपेक्षित पाऊस कोसळला नाही. आर्धा ऑगस्ट महिना संपत आला तरीही राज्यातील अनेक जिल्हे अद्याप तहानलेली आहेत. मागील तीन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर पुन्हा राज्यात पावसानं ब्रेक (Rain took break in Maharashtra) घेतला आहे.
पुढील पाच दिवस राज्यात पावसाची पूर्णपणे उघडीप राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी राज्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मागील तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला होता. त्यानंतर राज्यात पावसाची वापसी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र पावसानं पुन्हा ब्रेक घेतला आहे. पुढील पाच दिवस राज्यात सर्वदूर कुठेही पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी हलक्या रिमझिम पावसाच्या सरी कोसळू शकतात.
हेही वाचा-या राज्यात शाळा उघडताच दोन शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव; 20 मुलं बाधित
मराठवाड्यात विजांचा कडकडाट पण पावसाची शक्यता कमी
मागील बऱ्याच दिवसांपासून मराठवाड्याला चांगल्या पावसाची आतुरता लागली आहे. खानदेश आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. आहे. पुढील पाच दिवस मराठावाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या आठ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याचं प्रमाण अधिक असणार आहे. या ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण याठिकाणी पावसाची शक्यता कमीच आहे.
हेही वाचा-इबोला अन् कोरोनाहून घातक विषाणूचं जगावर संकट; मारबर्ग विषाणूबाबत WHOने केलं सावध
राज्यात पावसासाठी पोषक हवामान नसल्यानं कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अकोला येथे सर्वाधिक 35.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्ध्यात तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं. अनेक ठिकाणी उकाड्यातही वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Weather forecast