Home /News /mumbai /

'भाजपच्या आमदारांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केली' भास्कर जाधवांनी सांगितलं दालनात काय घडलं?

'भाजपच्या आमदारांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केली' भास्कर जाधवांनी सांगितलं दालनात काय घडलं?

  मुंबई, 05 जुलै: सभागृहात अनेक वादाचे प्रसंग येतात, वाद होत असतात. पण त्यावेळी फडणवीस आणि त्यांचे सदस्य शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हते. इतर सदस्यांनी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. राडेबाज करणाऱ्या गुंडाप्रमाणे ते धावून आले' असा खळबळजनक खुलासा विधानसभेचे तालिका सभापती भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला. पावसाळी अधिवेशनात गोंधळ आणि सभापतींना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित (12 BJP MLAs suspended) करण्यात आले आहे. सभागृहात बोलत असताना शिवसेनेचे आमदार आणि तालिका सभापती भास्कर जाधव यांनी दालनात काय घडलं यांची माहिती दिली. 'भाजपचे आमदार घोषणाबाजी करत होते. विधेयक सादर करणे हा कार्यक्रम होता. त्यावेळी काही नॉर्मल वातावरण झाले. विधेयक मांडले जात असताना  त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली मतं माडत असतात. मी गेल्या सहा टर्म आमदार विधानसभेचं कामकाज पाहिलं आहे. वरच्या सभागृहात सुद्धा काम केले आहे' अशी आठवण जाधव यांनी भाजपला करून दिली. भाजपच्या डझनभर आमदारांचं निलंबन, वाचा 12 निलंबित आमदारांच्या नावाची यादी 'आज सत्ताधारी पक्षातील मंत्री छगन भुजबळ यांनी प्रस्ताव मांडायचा होता. पण, त्याआधीच फडणवीस यांनी हरकत घेतली. जर कामकाज सुरू झाले नाही तर हरकत कशी घेतली? मी हे बोलू शकलो असतो पण त्यांना पूर्ण बोलू दिलं. त्याच वेळी विरोधकांचे आमदार उभेच होते. त्यांनी उभं राहू नये असंही त्यांना सांगितलं. फडणवीस यांनी कायदेशीररित्या बोलले तोपर्यंत सभागृह शांत होते. मी त्यांना सांगितलं की,  भुजबळ यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर तुम्ही हरकत घेऊन बोलू शकता असं सांगितलं' मी गेल्या 36 वर्षांपासून सभागृहाचं काम पाहतोय. अजितदादा, बाळासाहेब थोरात यांनी 1985 पासून सभागृहाचे कामकाज पाहिले आहे. मी आक्रमक आहे हे मान्य करतो, पण मी दिलेली वेळ कधी मागेपुढे केली नाही. भाजपच्या आमदारांनी माझ्यासमोरील माईक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना नियम करण्याचा इशारा दिला. सभागृहात वाद होता, एकमेकांवर धावून जातात. पण जेव्हा सभापतींनी कामकाज तहकूब केले तर वाद तिथेच थांबत असतो' असंही जाधव यांनी सांगितलं. 5 हजारांची गुंतवणूक ते 34 हजार कोटींचे मालक; राकेश झुनझुनवाला यांचा प्रवास 'सभागृहात वाद झाला असला तरी बाहेर गेल्यावर आपण राजकीय व्यक्ती आहोत. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी दालनात गेलो तेव्हा उपसभापतींनी मला बसण्याचे सांगितले. पण मी बसलो नाही. मी काही इथं कायमचा सभापती नाही. तितक्याच रागाच्या भरात फडणवीस आले. त्यांचा राग असणे स्वभावाविक होते, त्यांना बोलू दिले नाही. तिथे चंद्रकांत पाटील आले त्यांना मी बसण्यास सांगितले. सभागृहात अनेक वादाचे प्रसंग येतात, मी तुम्हाला पुन्हा बोलायला देईल. पण त्यावेळी फडणवीस आणि त्यांचे सदस्य शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हते. इतर सदस्यांनी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. राडेबाज करणाऱ्या गुंडाप्रमाणे ते धावून आले, असा दावा जाधव यांनी केला. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे. काही भाजपच्या नेत्यांनी बाहेर जाऊन सांगितले की, मी भाजपच्या आमदारांना शिवीगाळ केली. जर मी शिवीगाळ केली असेल तर माझ्यावर जी कारवाई करायची असेल तर नक्की करावी. मी जर चुकीचा शब्द वापरला असेल तर तुम्ही जी शिक्षा द्या ती भोगण्यासाठी मी तयार आहे, असंही जाधव म्हणाले.

  MPSC विध्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्रवीणचा संताप; म्हणाला, जगणार फक्त राजकारणी

  दालनामध्ये काही शिवसेनेचे आमदार आले होते. आम्ही सगळे रागात होतो हे मान्य आहे, बाचाबाची झाली. त्यानंतर आपण एकमेकांच्या गळ्यात भेटलो. आम्ही तीन वेळा तुमची माफी मागितली. तुमच्याकडे संख्याबळ आहे. तुम्ही प्रस्ताव मांडू शकता. भास्करराव जाधव म्हणून तुमचा सन्मान आहे. तुम्ही मोठ्या मनाने चर्चा केली पाहिजे, त्यानंतर कारवाई केली पाहिजे, कुणी वासरू मारला म्हणून गाय मारेल. हे योग्य नाही. दोन्ही बाजूचे आमदार भिडले, त्यावेळी मी स्वत: सर्वांना बाजूला केलं, असंही फडणवीस म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: BJP, Maharashtra, Mla, Mumbai

  पुढील बातम्या