Home /News /mumbai /

monsoon season : भाजपला मोठा धक्का, अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांच्या निलंबनाची शक्यता

monsoon season : भाजपला मोठा धक्का, अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांच्या निलंबनाची शक्यता

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले.

मुंबई, 05 जुलै : पावसाळी अधिवेशनाची (monsoon season Maharashtra) सुरुवात वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे आता भाजपच्या डझनभर आमदारावर निलंबनाची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Gold Price Today: मौल्यवान धातूच्या दरात आजही घसरण कायम; पाहा सोन्या-चांदीचा दर

यामध्ये भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, पराग आळवणी, हरिष मारूती आप्पा यांची नावं भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे. यात आणखी आमदारांचा सहभाग होण्याची शक्यता आहे.  देवेंद्र फडणवीसांनी हेडफोन दिला फेकून! राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला आणि तो मंजूर केला. पण यावेळी भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. भुजबळांनी पुराव्यानिशी फडणवीसांचा काळात झालेल्या पत्रव्यवहारच सभागृहात वाचून दाखवला. त्यावर फडणवीस हे बोलण्यासाठी उभे राहिले पण सभापती भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या व्यासपीठाला घेराव घातला. इकडे बोलू न दिल्यामुळे फडणवीस यांनी माईकच फेकून दिला. या गोंधळातच ओबीसी आरक्षणाबाबतच ठराव मंजूर करण्यात आलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या