आला रे आला ! अखेर मान्सून मुंबईत दाखल

Monsoon In Mumbai : अखेर मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 01:24 PM IST

आला रे आला ! अखेर मान्सून मुंबईत दाखल

मुंबई, उदय जाधव, 25 जून : मुंबईकरांना आस लागून राहिलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. राज्यतील इतर भागांमध्ये मान्सून सक्रीय झाल्यानंतर मुंबईकरांना मात्र मान्सूनची प्रतिक्षा होती. पण, आता मुंबईकरांची मान्सूनची प्रतिक्षा संपली असून मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पावसाअभावी सध्या मुंबईकर उकड्यानं देखील हैराण आहेत. शिवाय, पाणी कपातीचा देखील मुंबईकरांना सामना करावा लागणार आहे. पण, मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिल्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट देखील लवकरच टळण्याची शक्यता आहे. तसंच उकाड्यानं हैराण मुंबईकरांचे डोळे देखील पावसाकडे लागून राहिले आहेत. पण, आता लवकरच दिलासा मिळणार आहे. जूनचे तीन आठवडे हे कोरडेच गेले आहेत.

PNB Scam : मेहुल चोक्सीचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

राज्याच्या उर्वरित भागात पावसाची हजेरी

केरळमध्ये 7 जून रोजी दाखल झालेला मान्सून वायू चक्रीवादळामुळे राज्यात उशिरानं दाखल झाला. पण, मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसानं मात्र हजेरी लावली आहे. राज्यात भीषण दुष्काळ असून पावसामुळे अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील काही भागांमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.

गुजरात राज्यसभा निवडणूक; काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

Loading...

कोकणात देखील पाऊस

कोकणात देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये शेतीच्या कामांना जोर चढला आहे. लोकांनी पेरण्या देखील केल्या आहे. 7 जून ही मान्सून दाखल होण्याची तारीख पण, वायू चक्रीवादळाचा परिणाम हा मान्सूनच्या गतीवर झाला. त्यामुळे जवळपास 8 ते 10 दिवस उशिरानं पाऊस कोकणात दाखल झाला. मान्सून आता मुंबईत दाखल झाल्यानं राज्याचा सर्व भाग मान्सूननं व्यापून गेला आहे.

SPECIAL REPORT: या देशात 500 हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मांतर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...