CycloneVayu : पुढच्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

CycloneVayu : पुढच्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

वायू चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. मंगळवारी संध्याकाळपासून कोकण किनारपट्टीवर वेगाने वारे वाहू लागले आहेत आणि समुद्र खवळला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : अरबी समुद्रा कमी हवेचा पट्टा तयार झाल्यामुळे 'वायू' चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायू चक्रीवादळाचा मुंबईवर काही परिणाम होणार नाही. पण मंगळवारी संध्याकाळी महानगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याची माहितीही देण्यात आली आहे. चक्रीवादळाचा परिणाम मुंबईवर होणार असल्याच्या अनेक बातम्या देण्यात आल्या आहेत. पण हवामान विभागाने  हे खोटं ठरवलं आहे. विभागाकडून जारी करण्यात आलेल्या वेदर बुलेटिननुसार, समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 13 जूनपर्यंत चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वायू चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. मंगळवारी संध्याकाळपासून कोकण किनारपट्टीवर वेगाने वारे वाहू लागले आहेत आणि समुद्र खवळला आहे. त्यामुळे मासेमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

एककीकडे मुंबईमध्ये मंगळवारी संध्याकाळी जोरदार पाऊस होणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे वायू चक्रीवादळामुळे मान्सूनचं आगमन 2 ते 3 दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली .पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे.

वायू चक्रीवादळ सध्या अरबीसमुद्रमार्गे गुजरातकडे वेगाने सरकत असलं तरी त्याचा मुंबईला फारसा तडाखा बसणार नाही. गुजरातला मात्र, या चक्रीवादळाचा मोठा फटका बसू शकतो. पुणे वेध शाळेनेच यासंबंधीचा हवामान अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मान्सुनचं आगमन मात्र, किमान दोन ते तीन दिवसांनी लांबलं आहे.

गोव्यानजीक अरबी समुद्रात घोंघावणारं हे चक्रीवादळ नावाप्रमाणेच अगदी वायू वेगाने गुजराजच्या किनारपट्टीकडे कूच करतं आहे. त्याचा वेग ताशी 110 ते 120 प्रतिताशी किलोमीटर आहे. गुजरातमध्ये धडक मारल्यानंतर याच वायू चक्रीवादळाचा वेग ताशी 135 किलोमीटरपर्यंत वाढू शकतो.

साधारण 13 तारखेला हे चक्रीवादळ गुजरात राज्यावर धडक देईल त्यावेळी गुजरातमध्ये मुसळधार पावसासह मोठं वादळ येऊ शकतं. त्यामुळे प्रशासननाने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.

हेही वाचा : ट्रॅफिक जॅम होणारी ही आहेत 5 शहरं; 1 नंबरचं शहर पाहून व्हाल थक्क!

या चक्री वादळाचा महाराष्ट्राला विशेष तडाखा बसणार नसला तरी कोकण किनारपट्टी आणि मुंबईत येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडू शकतो. पण हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात उतरू नये, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

या चक्रीवादळामुळे मान्सूनची वाट मात्र केरळमध्येच अडवून धरलीय या चक्रीवादळाचा जोर कमी झाल्यानंतरच मान्सून गोव्यामार्गे महाराष्टात येईल. साधारण 14 सारखेला मान्सूनचं कोकण किनारपट्टीवर आमगन होणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

हे वायू चक्रीवादळ गुजरातकडे वेगाने सरकत असलं तरी खबरदारी म्हणून कोकण किनारपट्टी आणि मुंबईत कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात. कारण, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी पडणार आहेत.

VIDEO : जमीन हडपली का? धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2019 07:13 PM IST

ताज्या बातम्या