S M L

मोनोचा दुसरा टप्पा नोव्हेंबरपर्यंत होणार सुरू

वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा हा दुसरा टप्पा असेल. या टप्प्यात एकूण 10 स्टेशन असतील

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2017 10:16 AM IST

मोनोचा दुसरा टप्पा नोव्हेंबरपर्यंत होणार सुरू

13 एप्रिल : मोनोचा दुसरा टप्पा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा हा दुसरा टप्पा असेल. या टप्प्यात एकूण 10 स्टेशन असतील.

मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा या दृष्टीने फेब्रुवारी 2014 मध्ये वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दरम्यान मोनो मार्ग टाकण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यानंतर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. आता हे काम जवळपास पूर्ण झालंय.

त्यामुळे मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा मुंबईकरांना लागलीय. यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गावर चाचण्या घेणारेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मोनोचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार ते स्पष्ट होईल. अनेकदा डेडलाईन हुकलेली मोनो 2 आता ऑक्टोबर-नोव्हेंबर 2017 मधे सुरू होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close