09 नोव्हेंबर : मुंबईमधल्या मोनोरेलला आज पहाटे आग लागली. मैसूर कॉलनी स्थानकात उभ्या असलेल्या एका डब्यात ही आग लागली. यामुळे मोनोरेल ठप्प झाली, आणि ती दुपारच्या आत सुरू होण्याची शक्यता नाही, असं सांगण्यात येतंय. पहाटेचे पाच वाजून 20 मिनिटांनी ही आग लागली, आग शॉर्ट सर्किटमुळे लागली, असा प्राथमिक अंदाज आहे.
पहाटेची वेळ असल्यानं मोनोरेलमध्ये प्रवासी नव्हते, आणि त्यामुळे सुदैवानं जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलानं धाव घेत ही आग विझवली.
मोनोरेल मार्गावर अपघात होण्याची ही पहिली वेळ नाहीये. या वर्षी जुलैमध्ये दोन ट्रेन समोरासमोर आल्या होत्या. दोन्ही ट्रेनच्या चालकांच्या प्रसंगावधानामुळे अपघात होता होता राहिला. 2011मध्ये मोनोरेलचं काम सुरू असताना बीम कोसळल्यामुळे 2 कामगारांचा मृत्यू झाला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा